मुंबई - Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' चा अंतिम सामना शनिवारी झाला. रोहित शेट्टी हा स्टंट आधारित रिअॅलिटी शो होस्ट करतो. रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 13'चा विजेता ठरला आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धकांनी प्रवेश केला होता. प्रत्येकजण एकमेकांना जोरदार स्पर्धा देत होते. दरम्यान आता डिनो जेम्सने या शोची ट्रॉफी जिंकली आहे. या स्टंट-रिअॅलिटी शोचा प्रीमियर 15 जुलै रोजी झाला. हा शो थरारक स्टंट, भीती आणि काही वादांनी खूप चर्चेत होता. 'खतरों के खिलाडी सीझन 13' शो तीन महिन्यांचा रोलर कोस्टर होता. या शोमध्ये डिनो जेम्स व्यतिरिक्त शिव ठाकरे, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि रश्मीत कौर हे देखील पहिल्या पाचमध्ये स्पर्धकांमध्ये होते. या सर्व स्पर्धकांना पराभूत केल्यानंतर, रॅपर आणि गायक डिनो जेम्सने शोच्या 13व्या सीझनची ट्रॉफी जिंकली.
-
Let’s congratulate the winner of Khatron Ke Khiladi Season 13, @DinoJmsOfficial for his victory by showering ‘💌’ in the comments below.#KKK13GrandFinale #KhatronKeKhiladi #KhatronKeKhiladi13 #KKK13 #RohitShetty pic.twitter.com/BczCTYlsTl
— ColorsTV (@ColorsTV) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Let’s congratulate the winner of Khatron Ke Khiladi Season 13, @DinoJmsOfficial for his victory by showering ‘💌’ in the comments below.#KKK13GrandFinale #KhatronKeKhiladi #KhatronKeKhiladi13 #KKK13 #RohitShetty pic.twitter.com/BczCTYlsTl
— ColorsTV (@ColorsTV) October 14, 2023Let’s congratulate the winner of Khatron Ke Khiladi Season 13, @DinoJmsOfficial for his victory by showering ‘💌’ in the comments below.#KKK13GrandFinale #KhatronKeKhiladi #KhatronKeKhiladi13 #KKK13 #RohitShetty pic.twitter.com/BczCTYlsTl
— ColorsTV (@ColorsTV) October 14, 2023
रोहितने पोस्ट लिहून चाहत्यांचे मानले आभार : ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, अर्चना गौतम, अर्जित तनेजा, डेझी शाह, डिनो जेम्स, नायरा बॅनर्जी, रश्मीत कौर, रोहित रॉय, रुही चतुर्वेदी, शीझान खान, शिव ठाकरे आणि सौंदस मौफकीर या एकूण 14 स्पर्धकांनी सीझन 13 मध्ये भाग घेतला. हा शो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये शूट करण्यात आला. 2 ऑक्टोबर हा 'खतरों के खिलाडी 13' च्या शूटचा शेवटचा दिवस होता. शूट संपल्यानंतर रोहितनं सर्व स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानणारी पोस्ट लिहिली होती. 'खतरों के खिलाडी 13' मध्ये बरेच खतरनाक आणि नवीन स्टंट पाहायला मिळाले. या शोदरम्यान रोहित शेट्टीनं अनेक स्पर्धकांना फटकारले.
डिनो जेम्सला ट्रॉफीसोबत काय मिळाले? : शेट्टीनं विजेत्याच्या नावाची घोषणा केली. सीझन 13 जिंकल्याबद्दल डिनो जेम्सला ट्रॉफी, मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि 20 लाख रुपये बक्षीस देण्यात आले. दरम्यान अंतिम फेरीत स्पर्धकांना हेलिकॉप्टर स्टंट करायचा होता.अर्जित तनेजानं पहिला स्टंट केला होता. या स्टंटमध्ये त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर ऐश्वर्या शर्मानं स्टंट करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा स्टंट पूर्ण करू शकली नाही. शेवटी डिनो जेम्सनं स्टंट केला. या स्टंटमध्ये त्यानं अतिशय वेगवान कामगिरी केली. स्टंट करण्यासाठी अर्जितनं 12 मिनिटे 24 सेकंद घेतले तर डिनोनं 9 मिनिटे 55 सेकंदात स्टंट पूर्ण केला. जेम्स हा एक रॅपर आहे जो त्याच्या 'लूजर' गाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
हेही वाचा :
- Parineeti Chopra : लग्नानंतर पहिल्यांदाच परिणीती चोप्रा केला रॅम्प वॉक ; व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल...
- Ganapath : 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटात टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनचा पाहायला मिळणार वेगळा 'अंदाज'...
- Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं राखी सावंतविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल...