ETV Bharat / entertainment

KH 234: कमल हसन आणि दुलकर सलमानचं 'केएच 234' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज - फर्स्ट लूक प्रदर्शित

KH 234: साऊथचा सुपरस्टार कमल हासन 7 नोव्हेंबर रोजी 69 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, 'केएच 234'च्या निर्मात्यांनी त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. याशिवाय दुलकर सलमानचा देखील फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

KH 234
केएच 234
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 4:05 PM IST

मुंबई - KH 234 : 'विक्रम' या चित्रपटानंतर कमल हासनच्या एकामागून एक चित्रपटांच्या घोषणा होताना दिसत आहेत. सध्या त्याच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच मणिरत्नम यांच्या 'केएच 234'द्वारे (KH 234) रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तब्बल 36 वर्षांनंतर कमल हासन आणि मणिरत्नमची जोडी पडद्यावर खळबळ माजवणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना खूश करण्यासाठी, 7 नोव्हेंबर रोजी कमल हासनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, 'केएच 234' मधील त्याचा पहिला लूक रिलीज केला आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलनं आज त्याच्या एक्स पेजवर कमल हासनचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

कमल हासन फर्स्ट लूक रिलीज : या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'जबदस्त कहाणीला आलिंगन द्या! शीर्षक व्हिडिओची घोषणा आज संध्याकाळी 5 वाजता होईल. अविस्मरणीय अनुभवासाठी सोबत रहा'. या चित्रपटामधील पोस्टरमध्ये कमल हासनचा संपूर्ण चेहरा कापडानं झाकण्यात आला आहे. त्याचे फक्त डोळे दाखवण्यात आले आहेत. या पोस्टरवर 'केएच 234' असं तात्पुरतं शीर्षक लिहिलं आहे. कमल हासनचा फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर काही वेळातच निर्मात्यांनी दुलकर सलमानचे देखील पोस्टर रिलीज केले. या पोस्टवर त्यांनी लिहिलं, 'या अनोख्या प्रवासात दुलकर सलमानसोबत काम करण्यास उत्सुक.' त्याच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाबाबत लवकरच काही गोष्टी समोर येणार आहेत, मात्र सध्या या चित्रपटासाठी चाहते खूप आतुर आहेत.

'केएच 234'ची निर्मिती : कमल हसन आणि मणिरत्नम यांनी 36 वर्षांपूर्वी 'नायकन' या प्रोजेक्टवर काम केले होते. आता दोन्ही दिग्गजांनी पुन्हा एकदा हातमिळवणी केली आहे. 'केएच 234'ची निर्मिती राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज, रेड जायंट मुव्हीज, आर महेंद्रन आणि शिवा अनंत यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाच्या क्रूमध्ये गायक ए आर रहमान, सिनेमॅटोग्राफर रवी के. चंद्रन, संपादक श्रीकर प्रसाद आणि स्टंट कोरिओग्राफर अनबारीव यांचा देखील समावेश आहेत.

हेही वाचा :

  1. The Railway Men Trailer release : भोपाळ गॅस दुर्घटनाचा जीवघेणा थरार, 'द रेल्वे मेन'चा ट्रेलर प्रदर्शित
  2. Rashmika Mandanna Fake Video Viral : रश्मिका मंदान्नाचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल, बिग बींनी केली कारवाईची मागणी
  3. Rubina Dilaik oozes retro vibes : रुबिना दिलैकचं मॅटर्निटी फोटोशूट, अभिनव शुक्लानं केले पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.