मुंबई - प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा धाकटा भाऊ अभिनेता सनी कौशल आज 28 सप्टेंबर रोजी त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने कुटुंबीय आणि त्याचे मित्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या खास प्रसंगी, सनीची वहिनी आणि बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
'जीते रहो...खुश रहो' - कॅटरिना कैफने पती विकी कौशल आणि दीर सनी कौशलसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि लिहिले, 'जीते रहो...खुश रहो.' या फोटोत कॅटरिना आणि विकीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकी कौशलने भावाचे केले अभिनंदन - विकी कौशलने धाकटा भाऊ सनी कौशलसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, 'सर्व गुण संपन्न कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप खूप प्रेम.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सनीच्या वडिलांनी दिले सनीला आशीर्वाद - दुसरीकडे, सनीचे वडील शाम कौशल यांनी मुलाच्या बालपण आणि तारुण्याच्या फोटोचा कोलाज शेअर करत लिहिले, सनी पुत्तर, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो, तुझ्यासारखा मुलगा होवो. मी धन्य आहे की मला कायमचे प्रेम मिळाले...रब राखा.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सनी कौशलचा वर्कफ्रंट - सनी कौशलने 2011 मध्ये माय फ्रेंड पिंटो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याने गोल्ड (2018) या चित्रपटातून बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर सनी भांगडा पाले (2020), शिद्दत (2021) आणि 2022 मध्ये हुडदंग या चित्रपटात तो दिसला होता.
हेही वाचा - रिचा चढ्ढा आणि अली फजलचा दिल्लीत रंगणार शाश्वत विवाह सोहळा