मुंबई - katrina kaif and Salman khan : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफची जोडी खऱ्या आयुष्यात हिट ठरली नसली तरी, रील लाईफमध्ये ही जोडी हिट आहे. कतरिना आणि सलमानच्या जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा, अनेकजण नाराज झाले होते. ब्रेकअप झाल्यानंतरही ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसते. कतरिना कैफ आणि सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. भाईजानचा हा चित्रपट दिवाळीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान आता एका मुलाखतीत कतरिना कैफनं सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलेपणानं सांगितलं आहे.
कतरिनानं केला खुलासा : कतरिनानं म्हटलं की, ''सलमान खानसोबतचं माझं व्यावसायिक समीकरण खूप चांगलं आहे, जेव्हा मी त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा मी पूर्णपणे या इंडस्ट्रीत नवीन होते. सलमाननं 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण जेव्हा मी त्याच्यासोबत दुसरा चित्रपट केला, तेव्हा मला खूप चांगला अनुभव आला. सलमान खान हे एक सरप्राईज पॅकेज आहे, त्याच्यासोबत काम करणे म्हणजे, तुम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. सलमानबरोबर काम करण्यासाठी खूप मोकळं मन असावं लागतं''. पुढं कतरिना कैफनं म्हटलं की, आजही तिला सलमान खानबद्दल आदर आहे.
'टायगर 3' केली जबरदस्त कमाई : कतरिना कैफनं सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ही हिट जोडी आतापर्यंत शेवटची 'टायगर 3' मध्ये दिसली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये सुरू असला तरी या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. 'टायगर 3'नं रुपेरी पडद्यावर 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'टायगर 3' या चित्रपटामध्ये कतरिना कैफ, सलमान खान, इमरान हाश्मी , रिद्धी डोगरा, आशुतोष राणा, रेवती मेनन अनुप्रिया गोएंका, रणवीर शौरी आणि इतर कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे. हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. आता ओटीटीवर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अनेकजण वाट पाहत आहेत.
हेही वाचा :