ETV Bharat / entertainment

न भेटताही विकी कौशलच्या प्रेमात पडली होती कतरिना कैफ, अशी सुरू झाली 'लव्ह स्टोरी' - विकी आणि कतरिना आज लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे

Katrina and Vicky 2nd Wedding Anniversary:हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवरफुल कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ हे आज 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. या जोडप्याची प्रेमकहाणी जाणून घेण्यासाठी वाचा.

Katrina and Vicky 2nd Wedding Anniversary
कतरिना आणि विकीच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 11:48 AM IST

Updated : Dec 9, 2023, 12:05 PM IST

मुंबई - Katrina and Vicky 2nd Wedding Anniversary : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज 9 डिसेंबर रोजी या जोडप्यानं राजस्थानमध्ये शाही लग्न केलं होतं. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होते. विकीनं लग्नाच्या एक दिवस आधी कतरिना कैफला प्रपोज केलं होतं. 9 डिसेंबर रोजी या सुंदर जोडप्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. विकी कौशलला सुरुवातीपासूनच कतरिना कैफ आवडत होती. विकीनं कधीच विचार केला नव्हता की, त्याच्यासोबत कतरिना लग्न करेल. कतरिना ही विक्कीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे.

विकी कौशलनं केलं होत प्रपोज : विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या व्यग्र दिनचर्येतमधून वेळ काढून एकामेकांबरोबर वेळ घालवतात. अलीकडेच विकी कौशलनं खुलासा केला होता की, तो लग्नाच्या एक आठवडा आधी कतरिनाच्या कुटुंबाला भेटला होता आणि त्यानं लग्नाच्या एक दिवस आधी कतरिना कैफला प्रपोजही केलं होतं. कतरिना आणि विकी एका अवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी एका संभाषणातून सलमान खानसमोर विकी कौशलनं कतरिना कैफचं कौतुक केलं होत. त्यावेळी भाईजान विकीच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. या अवॉर्ड शोमध्ये विकीनं कतरिना कैफला उघडपणे सांगितलं होतं की, 'तू एक चांगला विकी कौशल शोधून त्याच्याशी लग्न का करत नाहीस'. यावर अनेकजण हसले होते. त्यानंतर कतरिनाही उभी राहिली आणि तिनं एक गोड स्माईल दिली होती.

कतरिना कैफ विकीच्या प्रेमात पडली : कतरिना कैफनं विकी कौशलला त्याच्या 'मनमर्जियां' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर कतरिनानं दिग्दर्शिका झोया अख्तरला विकीबद्दलच्या तिच्या भावना सांगितल्या होत्या. त्याचवेळी, 'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरने विकीला सांगितलं होतं की, कतरिना कैफला त्याचं काम आवडलं आहे. त्यानंतर या जोडप्याची लव्ह स्टोरी सुरू झाली. या कपलनं राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करून सर्वांना एक सुखद धक्का दिला होता. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. या लग्नात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा :

  1. बाल कलाकारांच्या भावविश्वाचा प्रवास उलगडणारा माहितीपट 'फर्स्ट अ‍ॅक्ट'
  2. ज्येष्ठ अभिनेता ज्युनियर मेहमूद यांच्यावर अंत्यसंस्कार
  3. धर्मेंद्रने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, सनी बॉबीसह 'ड्रीम गर्ल'नेही दिल्या शुभेच्छा

Last Updated : Dec 9, 2023, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.