ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 2' च्या टायटल ट्रॅकमध्ये कार्तिक आर्यनने दाखवले नृत्य कौशल्य - कार्तिक आर्यन लेटेस्ट न्यूज

कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेल्या ''भूल भुलैया 2'' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज केले आहे. जरी हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार असला तरी, शीर्षक ट्रॅकने रिलीजच्या काही तासांतच चर्चा निर्माण केली आहे.

कार्तिक आर्यनने दाखवले नृत्य कौशल्य
कार्तिक आर्यनने दाखवले नृत्य कौशल्य
author img

By

Published : May 2, 2022, 7:42 PM IST

मुंबई - ''भुल भुलैया 2'' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित शीर्षक ट्रॅक सोमवारी दुपारी प्रदर्शित झाला आहे. या ट्रॅकमध्ये कार्तिक आर्यन उर्फ ​​'रुह बाबा' सर्वांना भुल भुलैया सांगताना दिसत आहे. नीरज श्रीधर यांनी हे गाणे गायले आहे आणि तनिष्क बागचीने संगीत पुन्हा तयार केले आहे. या गाण्यात अभिनेता कार्तिक आर्यनने केलेला एक नवीन हुक स्टेप पाहायला मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे गाणे शेअर केले आहे, "रूह बाबासोबत झिगझॅग स्टेप करा !! Bhool Bhulaiyaa2 TITLE TRACK OUT NOW." असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार असला तरी शीर्षक ट्रॅकने आधीच चर्चा निर्माण केली आहे. चाहत्यांनी ज्या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी ज्या संख्येने टाकल्या आहेत त्यावरुन तर हा ट्रॅक चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते.

कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी अभिनीत हा चित्रपट प्रियदर्शनच्या 2007 च्या लोकप्रिय चित्रपट भूल भुलैयाचा सीक्वल आहे. मल्याळम अभिनेता फहद फसल यांचे वडील फाझिल दिग्दर्शित 1993 मल्याळम चित्रपट 'मणिचित्रथाझू'चा रिमेक होता.

हेही वाचा - अनन्या पांडेने शेअर केले 'फीलिंग क्यूट' फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.