मुंबई : कार्तिक आर्यनने सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २' चित्रपट पाहून स्वातंत्र्य दिवस साजरा केला. प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्यासाठी तो मुंबईतील एका चित्रपटगृहामध्ये पोहचला होता. 'गदर २' चित्रपट पाहिल्यानंतर कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर थिएटरमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहले, 'इटस् गदर टाईम', असे त्याने लिहले आहे. चित्रपट संपल्यानंतर, कार्तिक आर्यन थिएटरमधून बाहेर पडतांने त्याला पापाराझींनीने स्पॉट केले. कार्तिक यावेळी सुंदर लूकमध्ये होता. त्याने तपकिरी पँटसह पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. याशिवाय त्याने या लूकला आणखी खास बनविण्यासाठी टोपी घातली होती. तो नेहमीसारखा साधा आणि मोहक दिसत होता. कार्तिक हा लोकांना दिसल्यानंतर थिएटरसमोर खूप गर्दी झाली होती.
कार्तिक आर्यन पाहिला 'गदर २' : यापूर्वी, कंगना रणौतने देखील अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस यशावर प्रतिक्रिया दिली होती. तिने शेअर करत लिहले , 'लोकांच्या जीवनात उत्साह आणि राष्ट्रवाद परत आणला आहे'. असे लिहून तिने चित्रपटाचे कौतुक केले होते. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेला, 'गदर २' ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. हा चित्रपट 'गदर: एक प्रेम कथा'चा रिमेक आहे जो २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' चित्रपटाला रिलीजपासूनच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाने पार केला २०० कोटीचा आकडा : 'गदर २' चे सोशल मीडियावर प्रेक्षक आणि समीक्षक खूप कौतुक करत आहे. 'गदर २'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करून सर्वाना चकित केले होते. स्वातंत्र्यदिनीही या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने १५ ऑगस्ट रोजी ५५ कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २२९ कोटी इतके झाले आहे. हा चित्रपट लवकरच ३०० कोटीचे लक्ष गाठेल असे दिसत आहे. 'गदर २' चित्रपटामधील गाणी ही प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे या चित्रपटाला पाहण्यासाठी आणखी गर्दी वाढत आहे.
हेही वाचा :