मुंबई - बॉलिवूडचा उदयोन्मुख स्टार कार्तिक आर्यन हा पडद्यावरचा लव्हर बॉय असल्याचे म्हटले जाते. कार्तिकच्या कथित रोमान्सची चर्चा सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरत आली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वाने मुलींना सतत घायाळ करत असतो. कार्तिक त्याचा आगामी चित्रपट शेहजादाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. अभिनेता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शहरात फिरत असून पहिल्यांदाच तो या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणूनही पदार्पण करत आहे. एका प्रमोशनल इंटरव्ह्यू दरम्यान कार्तिकला त्याच्या लव्ह लाईफबद्दल आणि त्याची सध्याची रिलेशनशिप स्टेटस काय आहे याबद्दल विचारण्यात आले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कार्तिक आर्यनने सांगितले की तो अविवाहित आहे हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनसोबतच्या त्याच्या नवोदित रोमान्सबद्दलच्या अफवा तरीही हेडलाइन बनत राहतात. पूर्वीच्या एका मुलाखतीत, कार्तिक आर्यनने सांगितले होते की त्याला आपला सर्व वेळ त्याच्या कामासाठी समर्पित करायचा आहे आणि एक प्रभावी फिल्मोग्राफी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यामुळे रिलेशनशिप जोपासण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
लेटेस्ट मुलाखतीत, कार्तिकने मात्र संभाव्य जोडीदारामध्ये कोणते गुण शोधले आहेत याचा खुलासा करण्यास काहीच हरकत नाही. कार्तिकला वाटते की त्याची वेव्हलेन्ग्थ जुळली पाहिजे व आपल्या जोडीदाराची विनोदबुद्धी देखील तितकीच महत्त्वाची आहे. कार्तिक म्हणाला की नातेसंबंधातील आदर हा देखील एक महत्त्वाचा पैलू आहे तर बिनशर्त प्रेम या यादीत सर्वात वरच्या स्थानी आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अलिकडेच शेहजादा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत ताजमहल परिसरात दिसला होता. ही रोमँटिक जोडी चक्क ताज महलमध्ये पाहून उपस्थितांच्या नजरा ताजमहलपेक्षा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दोघांनी ताज समोर रोमँटिक मूडमध्ये फोटो सेशन केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केलेले हे फोटो शूट व व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी कार्तिक आणि क्रितीचे फॅन्स उतावीळ झाले आहेत. कार्तिक आर्यनचा भुल भुलैय्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २६६ कोटींचा गल्ला कमवला होता.
शेहजादा या चित्रपटाशिवाय कार्तिककडे अनेक मनोरंजक चित्रपट आहेत. हा अभिनेता सत्यप्रेम की कथा या चित्रपटात कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे, तर त्याच्याकडे आणखी एक रोमँटिक चित्रपट आशिकी 3 आहे. हंसल मेहताच्या कॅप्टन इंडियामध्ये कार्तिक पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर, तो कबीर खानच्या अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटातही झळकणार आहे.