ETV Bharat / entertainment

Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामधील फोटो केला शेअर; संधी दिल्याबद्दल दिग्दर्शकाचे मानले आभार... - कार्तिक आर्यननं शेअर केला फोटो

Kartik Aaryan : कबीर खानचा 'चंदू चॅम्पियन' हा त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामधील एक फोटो कार्तिक आर्यनचा सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तोयुद्ध भूमीत दिसत आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 1:53 PM IST

मुंबई - Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'मुळे खूप चर्चेत आहे. आता सध्या कार्तिकनं लंडनमधील चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट स्पोर्टस् ड्रामा असणार आहे. कार्तिक पहिल्यांदाच बायोपिक करतोय. या चित्रपटासाठी तो खूप उत्सुक आहे. कार्तिक आर्यन सुरुवातीपासूनच त्याच्या चित्रपटाबद्दल अपडेटस् देत आहे. दरम्यान आता कार्तिकचा या चित्रपटातील युद्धाच्या दृश्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कार्तिक आर्यन हातात एक लांब बंदूक घेऊन सैनिकाच्या लूकमध्ये दिसत आहे. कार्तिकचा हा फोटो पाहून चाहते खुश झाले आहेत.

कार्तिक आर्यननं शेअर केला फोटो : 'चंदू चॅम्पियन' चित्रपटातील हा फोटो शेअर करताना कार्तिकनं लिहिलं की, हा 8 मिनिटांचा सिंगल शॉट वॉर सीन खूपच आव्हानात्मक आणि कठीण होता, पण सीन माझ्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय देखील आहे. मला आयुष्यभरासाठी या अविस्मरणीय दृश्याशी जोडल्याबद्दल धन्यवाद कबीर खान सर'. यापूर्वी या चित्रपटाच्या सेटवरून कार्तिकचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक झाडाखाली खुर्चीवर बसून 3 रुपयांमध्ये केस कापत होता. याशिवाय याठिकाणी केस कापण्याचे दरही बोर्डवर लिहल्या गेले होते. केस कापण्याचा दर 7 रुपयांपासून 5 रुपयांपर्यंत होता. त्याचवेळी कार्तिक आर्यन हेअरस्टाईल कटिंगचा दर फक्त 3 रुपये होता. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिक आर्यननं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'चंदू चॅम्पियन हेअर कट, झाडाखाली'. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती.

कार्तिक आर्यनचं चाहत्यांनी केलं कौतुक : त्यानंतर या व्हिडिओवर कार्तिकचे अनेक चाहते कमेंट करत त्याचे कौतुक करत होते. काही चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले होते की, 'आम्ही अपॉइंटमेंट बुक करत आहेत'. याशिवाय या व्हिडिओवर अनेकजणांनी हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले होते. कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 14 जून 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. Arjun Kapoor And Salman Khan : अर्जुन कपूरनं संपवलं सलमान खानसोबतच कोल्ड वॉर ; 'टायगर 3'चा व्हिडिओ केला लाईक...
  2. Latest Box Office Day 4 : अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' आणि भूमी पेडणेकरचा 'थँक यू फॉर कमिंग' हे चित्रपट सातव्या दिवशी किती कमाई करेल ?
  3. Akshay Kumar On Mission Raniganj: 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट : अक्षय कुमार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.