मुंबई: सध्या कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या नवीन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. रिलीजच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने सर्वात कमी कमाई केली असली तरी कार्तिक आणि कियारा यांच्या नवीन चित्रपटाने ५ दिवसात ४० कोटींचा आकडा पार केला आहे. दरम्यान, कार्तिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची को-स्टार कियारा अडवाणीसोबत दिसत आहे.
कार्तिक आर्यनने शेअर केला व्हिडिओ : कार्तिकने मंगळवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर कियारा अडवाणीसोबतची एक क्लिप अपलोड केली. क्लिपमध्ये तो त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातील 'आज के बाद तू मेरी रहना' हे गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कार्तिकने कॅप्शन दिले आहे की, 'असे गाणे गावे की ४ लोक म्हणतील आता गाणे गाऊ नको. इंकी तुझ्या सिंगिंग केमिस्ट्रीही शंभर टक्के आहे. सत्तू आणि कथा या गाण्यांना प्रसिद्धीसोबतच प्रेमही मिळत आहे. असे त्याने लिहले आहे.
कार्तिक आर्यनच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या कमेंट : कार्तिक आर्यनच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. दरम्यान, कमेंट विभाग हा मजेदार इमोजींनी भरला आहे. एका चाहत्याने मजेशीर इमोजीसह लिहिले, 'आणखी ४ जणांसारखे गाणे गा.' दुसऱ्याने लिहिले की, 'इंडियन आयडॉलचे दरवाजे तुमच्यासाठी खुले झाले आहेत.' दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने मजेदार इमोजीसह कमेंट केली आहे, 'कॅप्शन अशा प्रकारे लिहा की ४ लोक अनिच्छेने सहमत असतील. अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.
चित्रपटाची कमाई : कार्तिक-कियारा यांच्या चित्रपटाने सोमवारी ४.२५ कोटी कमावले, जे चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसापेक्षा खूपच कमी आहे. तर, शनिवार आणि रविवारी चित्रपटाने दुहेरी अंकात व्यवसाय केला आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत ४२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट फार जास्त प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटामधील गाणे देखील फार जास्त हिट झाले आहे. हा चित्रपट १०० कोटीचा आकडा लवकरच पार करणार असे दिसत आहे.
हेही वाचा :