ETV Bharat / entertainment

Bhool Bhulaiyaa 3 : भूल भुलैया 3 सह रुपेरी पडद्यावर पुन्हा परतणार कार्तिक आर्यन - भूल भुलैया ३ हा चित्रपट बनणार

भूल भुलैया ३ हा चित्रपट बनणार हे निश्चित मानले जात आहे. कार्तिक आर्यनने या चित्रपटाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रुह बाबा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

Bhool Bhulaiyaa 3
Bhool Bhulaiyaa 3
author img

By

Published : Mar 2, 2023, 10:00 AM IST

मुंबई - भूल भुलैया 2 या चित्रपटाला २०२२ मध्ये अभूतपूर्व यश मिळाले. कोविड नंतर प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलेल्या या चित्रपटाने २६० कोटींचा व्यवसाय केला होता. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची उत्तम केमेस्ट्री यात पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर याचा आगामी सिक्वेल नक्की येणार असल्याचे निर्मात्यांनी संकेत दिले आहेत.

भूल भुलैया ३ मध्ये पुन्हा एकदा कार्तिक आर्यन झळकणार असल्याची पुष्टीही निर्माता भूषण कुमार यांनी दिली आहे. कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी ही बातमी खास आनंदाची आहे. कारण भूल भुलैया २ जेव्हा बनला होता तेव्हा या सीक्वेलमध्ये पुन्हा अक्षय कुमार असेल असेच सर्वांना वाटले होते. मात्र त्याची जागा कार्तिकने घेतल्यानंतर चित्रपटाच्या यशाबद्दल अनेकांना संशय वाटत होता. असे असतानाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करुन बॉलिवूड अभी जिंदा है याची कोविड नंतर जगाला खात्री दिली होती.

भूल भुलैया ३ हा चित्रपट बनणार हे निश्चित मानले जात आहे. कार्तिक आर्यनने या चित्रपटाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रुह बाबा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. या चित्रपटात आत्मा कार्तिक आर्यनच्या शरिरात प्रवेश करणार आहे. एकंदरीतच एक धमाल हॉरर कॉमेडी चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करेल असेच टीझर पाहून वाटत आहे.

भूल भुलैया हा प्रियदर्शन दिग्दर्शित पहिला चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. भारतीय हिंदी-भाषेतील कॉमेडी हॉरर चित्रपट मल्याळम चित्रपट मणिचित्रथाझू या १९९३ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात सुपरस्टार अक्षय कुमारसह विद्या बालन, शायनी आहुजा, अमिषा पटेल, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी, असरानी आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २००७ मध्ये २५ कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ८४ कोटींची कमाई करुन सर्वांचे डोळे दिपवले होते. भुल भुलैया रिलीज झाल्यावर समीक्षकांसह प्रेक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

भूल भुलैया २ ची निर्मिती करत असताना टीममध्ये अनेक बदल झाले. प्रियदर्शन ऐवजी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी अनीस बाज्मी यांनी निमंत्रीत करण्यात आले आणि अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले. शिवाय अभिनेत्री तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांचाही कलाकारांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला. या नव्या टीमने कमाल करुन दाखवली आणि चित्रपट सुपरहिट ठरला होता.

हेही वाचा - Virat Kohli On Anushka Sharma : अनुष्काच्या मातृत्व प्रवासाने बदलला विराटचा दृष्टीकोन; म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.