ETV Bharat / entertainment

'टॉक्सिक'मध्ये साऊथ सुपरस्टार यशसोबत करणार स्क्रिन शेअर करीना कपूर खान - करीना कपूरची एंट्री

Kareena Kapoor Movie: अभिनेत्री करीना कपूर साऊथ अभिनेता यशसोबत 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये दिसणार असल्याचं समजत आहे. आता या चित्रपटाच्या शुटिंगलाही लवकरच सुरूवात होणार आहे.

Kareena Kapoor Movie
करीना कपूर खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 4:17 PM IST

मुंबई - Kareena Kapoor Movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर रोहित शेट्टी दिग्दर्शित कॉप फ्रँचायझी 'सिंघम 3' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. दरम्यान करीनाचं नाव एका रोमँटिक थ्रिलर चित्रपटाशी जोडले जात आहे. अलिकडेच एक बातमी समोर आली आहे की, करीना कपूर साऊथ अभिनेता यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटातून कन्नड फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहे. दिग्दर्शक गीतू मोहनदास आणि सुपरस्टार यश लवकरच 'टॉक्सिक'मध्ये करीना कपूरच्या एन्ट्रीबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाचे शुटिंग हे काही दिवसांनंतर सुरू होईल. 'टॉक्सिक'मध्‍ये करिना कपूरच्‍या एन्‍ट्रीच्‍या वृत्तामुळे चाहत्‍यांची उत्‍सुकता वाढली आहे.

यशच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची एंट्री : गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये यशनं त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली होती. त्यानं 'टॉक्सिक' या चित्रपटाची घोषणा केली होती. यानतंर यशचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहात आहेत. आता या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे. 'टॉक्सिक'चं शीर्षक उघड करताना यशनं एका व्हिडिओद्वारे चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती. केव्हीएन प्रॉडक्शनने निर्मित केलेला हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री साई पल्लवी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन कामासाठी यश लंडनला गेला होता.

करीना कपूर वर्क्रफंट : करीना कपूर खानच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त हे अभिनेता यशच्या चित्रपटात दिसले आहेत. हे दोन्ही बॉलिवूड स्टार्स 'केजीएफ 2' मध्ये दिसले होते. 'टॉक्सिक' हा यशच्या कारकिर्दीतील 19 वा चित्रपट आहे. दरम्यान करीना कपूरच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर ती, शेवटची हंसल मेहताच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती 'द क्रू' 'तख्त' आणि 'वीरे दी वेडिंग 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'सिंघम 3'मध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, टाइगर श्रॉफ, अक्षय कुमार, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगसोबत दिसेल.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यू आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबद्दल केला खुलासा
  2. प्रीटी झिंटानं पती जीन गुडनॉफसोबत केला फोटो शेअर
  3. आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानचा विवाह मोठ्या थाटामाटात पडला पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.