ETV Bharat / entertainment

Karan Johar 51st Birthday : करण जोहर प्रदर्शित करणार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे फर्स्ट लूक पोस्टर - रणवीर सिंग

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधून दिग्दर्शनात पुन्हा परत आलेला आहे. करणने आतापर्यंतच्या प्रवासाची आठवण म्हणून त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियावर केली आहे.

Karan Johar
करण जोहर
author img

By

Published : May 24, 2023, 5:15 PM IST

मुंबई : तब्बल 6 वर्षांनंतर करण जोहर हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधून दिग्दर्शनात पुन्हा परत आलेला आहे. तसेच यावर्षी दिग्दर्शक म्हणून करणने 25 वर्षे पूर्ण केले आहे. आतापर्यंतच्या प्रवासाची आठवण म्हणून त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय करणचा २५ मे रोजी वाढदिवस आहे. तो यावर्षी ५१ वर्षांचा होईल.वाढदिवसाच्या निमित्याने तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. करणने इंस्टाग्रामवर एक मॉन्टेज व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांचे आतापर्यंचे हिंट चित्रपटाच्या छोट्या छोट्या काही झलक टाकल्या असून या व्हिडिओमध्ये त्याच्या आवाजासह चित्रपटाच्या बॅकग्राऊंडमध्ये चालत असलेले त्याचे दिग्दर्शनाचे काम देखील दाखविले आहे. त्याने याद्वारे त्याचा हिंदी चित्रपटसृष्टील प्रवास दाखविला आहे. तसेच त्याने चित्रपट निर्माता म्हणून चांगले काम केले आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट : व्हिडिओमध्ये सुरुवातीला राहुल, अंजली आणि टीनासह 'कुछ कुछ होता है' मधील क्लासिक सीक्वेन्स टाकले आहे. करण या व्हिडिओत त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटाचे वर्णन करतांना दिसत आहे. तसेच व्हिडिओची शेवट हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने होतांना दिसत आहे, ज्याचे वर्णन त्याने बोलतांना सांगितले आहे की, 'एक चित्रपट मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. शेवटी हा चित्रपट तयार आहे. प्रेम, कुटुंब आणि बरेच काही साजरे करण्यासाठी आमच्यासोबत सामील व्हा. असे त्यांने व्हिडिओद्वारे म्हटले आहे.

प्रेमाचा नवीन अध्याय : करण जोहरने ही पोस्ट लांबलचक कॅप्शनसह शेअर केली आहे. शेवटी, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' उद्या प्रथम पहा! असे म्हणून त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 28 जुलै यामध्ये सांगितली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिका असणार आहे, तर धर्मेंद्र आणि जया बच्चन हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी देखील या चित्रपटात झळकणार आहे. चाहते या चित्रपटाच्या रिलीजची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने त्याची इंस्टाग्राम पोस्ट पुन्हा शेअर केली आणि लिहिले, 'प्रेमाच्या नवीन युगाची सुरुवात आहे! जगभरातील लोकांच्या हृदयात अजूनही एक विशिष्ट स्थान टिकवून ठेवलेल्या प्यार आणि दोस्तीच्या कथा तुमच्यासाठी घेऊन आल्यानंतर, आता नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : Aamir And Fatima Playing Pickleball : आमिर खान आणि फातिमा सना शेख पिकलबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.