ETV Bharat / entertainment

Kanhaiya Twitter Pe Aja: विकी कौशल बनला भजन कुमार, 'द ग्रेट इंडियन फॅमिली'तील 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणे रिलीज - कन्हैया ट्विटर पे आजा गाणे रिलीज

द ग्रेट इंडियन फॅमिली चित्रपटामध्ये विकी कौशल पुन्हा भजन कुमारच्या भूमिकेत परतला आहे. यशराज चित्रपटातील पहिले गाणे कन्हैया ट्विटर पे आजा आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

Kanhaiya Twitter Pe Aja
विकी कौशल बनला भजन कुमार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 3:42 PM IST

मुंबई - यशराज फिल्म्सच्या निर्मात्यांनी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या आगामी चित्रपटातील 'कन्हैया ट्विटर पे आजा' हे पहिले गाणे रिलीज केले आहे. यात विकी कौशल भजन कुमारच्या भूमिकेत धमाल कराताना दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

यशराज फिल्म्सच्या आगामी कौटुंबिक ड्रामा चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली' मधील पहिले गाणे बुधवारी रिलीज करण्यात आले. यात विकी कौशल स्थानिक संगीतकार भजन कुमारची भूमिका साकारताना दिसतोय. यात तो भगवान कृष्णाच्या भव्यतेची स्तुती करत भक्तांसमवेत ताला सुरात नाचताना आणि गाताना दिसतोय. धार्मिक लोकांमध्ये दिसणारी शेंडी त्याच्या डोक्यावर दिसत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी भजन कुमार या गाण्यातून प्रेमाचे आवाहन करताना वेगवेगळ्या डिजीटल माध्यामातील संज्ञा गाण्यात वापरताना दिसतो. संगीतकार प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक नकाश अझीझने गायले आहे.

इन्स्टाग्रामवर हे गाणे शेअर करताना विकी कौशलने लिहिलंय, 'भजन कुमार आला आहे तुमच्या दारी. पाहा, 'कन्हैया ट्विटर पे आजा' यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर. द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.' या गाण्यातील त्याचा स्क्रिनवरील अवतार आणि त्याचा लूक प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. मात्र हे धार्मिक स्वरुपाचे गाणे असल्यामुळे लोक त्याला संमिश्र प्रतिसाद देत आहेत.

नामवंत गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिली आहे आणि या गाण्याला नृत्यदिग्दर्शक विजय ए गांगुली यांनी कोरिओग्राफ केले आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट २२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

या अगोदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'कन्हैया ट्विटर पे आजा' या गाण्याची रिलीज डेट जाहीर करून चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या. या चित्रपटामध्ये विकी कौशल सोबत सौंदर्यवती अभिनेत्री मानुषी छिल्लर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. काही दिवसापूर्वी विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्रामवर 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाच्या रिलीज तारखेचा खुलासा करणारा व्हिडिओ शेअर केला होता.

हेही वाचा -

१. Shreya Ghoshal In Indian Idol : इंडियन आयडॉलमध्ये 'स्पर्धक ते परीक्षक' प्रवास झाल्याने श्रेया घोषाल स्वतःला मानते धन्य

२. Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जी रक्षाबंधनासाठी 'जलसा'वर जाणार, अमिताभ बच्चन यांनी दिलं निमंत्रण

३. Allu Arjun : Allu Arjun : अल्लू अर्जुनने शेअर केला 'पुष्पा 2'च्या सेटवरील रोमांचक अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.