ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut on ISRO : 'इस्रो'मधील महिला शास्त्रज्ञांचं कंगना रणौतनं केलं कौतुक... - chandrayan 3

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने 'चंद्रयान 3' च्या यशामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आघाडीच्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक केले असून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटोसह खास कॅप्शन दिले आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 6:35 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. सध्या कंगना 'चंद्रयान 3' या मोहिमेमुळे खूप खुश आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर 'चंद्रयान 3' यशस्वीरित्या उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग करून एक ऐतिहासिक यश मिळवून दिले. त्यानंतर संपूर्ण जगभरात भारताचे कौतुक झाले. भारत हा पहिला देश ठरला, ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. या विक्रमामुळे इस्रो साइंटिस्टचे खूप सोशल मीडियावर कौतुक झाले आहेत. दरम्यान, कंगनाने 'चंद्रयान-३' मोहिमेच्या यशामागे इस्रोमधील महिला साइंटिस्टचे कौतुक केले आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत

कंगनाने केली पोस्ट : कंगनाने रविवारी इंस्टाग्राम स्टोरीजवर इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचे छायाचित्र शेअर केले आणि लिहिले, 'भारतातील आघाडीचे साइंटिस्ट, बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्र... साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे प्रतीक... भारतीयत्वाचे खरे सार'. अशी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान कंगना 'इमर्जन्सी' या पॉलिटिकल चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. ती या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यात अनुपम खेर, सतीश कौशिक आणि मिलिंद सोमण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कंगनाने हा चित्रपट मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली 'इमर्जन्सी'चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

'चंद्रमुखी 2'मुळे चर्चेत : कंगना रणौत आगामी 'चंद्रमुखी 2'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राघव लॉरेन्स देखील आहेत. रजनीकांत आणि ज्योतिका अभिनीत 'चंद्रमुखी' या ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपटाचा हा सीक्वल आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १५ सप्टेंबर रोजी हॉरर-कॉमेडी चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही वेगळ्या शैलीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटामधील कंगनाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. कंगनाचे हे लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

हेही वाचा :

  1. Rakhi sawant first umrah video : राखी सावंत त्या व्हिडिओनंतर झाली ट्रोल, प्रेक्षक म्हणाले नाटक...
  2. Sidharth Malhotra And Kiara Advani : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच सिद्धार्थ आणि कियारा दिसले एकत्र, पहा त्यांचा लूक
  3. Gadar २ vs OMG २ : वीकेंडमध्ये 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'चा झाला फायदा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.