ETV Bharat / entertainment

Kangana Ranauts new claim : हिरोंच्या खोलीत जात नसल्यामुळे फिल्म माफिया माझ्यावर नाराज, कंगना रणौतचा नवा दावा - Kangana Ranaut says she didnt go to heros room

कंगना राणौतने सोशल मीडियावर 'फिल्म माफियां'वर पुन्हा हल्ले केले आहेत. एका लांबलचक सोशल मीडिया पोस्टमध्ये या अभिनेत्रीने पैशासाठी हाय-प्रोफाइल विवाहसोहळ्यांमध्ये नाचणाऱ्या सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले आहेत. तिने असेही म्हटले आहे की तिला 'फिल्म माफिया' कडून लक्ष्य केले जाते कारण ती गॉसिप करत नाही आणि नायकाच्या खोलीत जात नाही.

कंगना रणौतचा नवा दावा
कंगना रणौतचा नवा दावा
author img

By

Published : Feb 27, 2023, 12:54 PM IST

मुंबई - कंगना रणौतने सोमवारी सोशल मीडियावर 'चित्रपट माफिया' बद्दलच्या तिच्या चकित करणार्‍या विधानांनी वादळ उठवले आहे. चित्रपट क्षेत्रात प्रस्थापित असलेल्यांच्या तालावर ती नाचत नसल्यामुळे तिला अलिप्त ठेवण्यात आल्याचेही तिने म्हटलंय. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट्सची मालिका शेअर केली ज्यामध्ये तिने कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी तिच्यावर कसे संस्कार झाले आहेत याचा उल्लेख केला आहे.

कंगना रणौतचा नवा दावा
कंगना रणौतचा नवा दावा

तिच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टमध्ये, कंगनाने फिल्म माफियावर नवीन हल्ला चढवला, हा शब्द ती बॉलिवूडमधील प्रस्थापित पॉवर प्लेयर्ससाठी उदारपणे वापरते. 35 वर्षीय अभिनेत्री कंगनाने सांगितले की तिची वृत्ती नेहमीच गर्विष्ठपणा मानली गेली आहे तर तिची जडणघडण आणि पालनपोषण तिला तिच्या मूल्य प्रणालीच्या विरोधात असलेल्या गोष्टींना हो म्हणू देत नाही. बॉलिवूडमधील घराणेशाही किंवा नेपोटिझमवर कंगना सतत आरोप करत आली आहे. करण जोहर, आलिया भट्टसह अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार नेहमी तिच्या निशाण्यावर असतात. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ती हातची जाऊ देत नाही. यामुळे अनेक जाणांच्या तिरस्काराचा विषयही ती बनत असते.

कंगनाने हाय प्रोफाइल विवाहसोहळ्यात परफॉर्म करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवरही ताशेरे ओढले आहेत. रणौत पुढे म्हणाली की 'फिल्म माफिया' तिला नावे ठेवतात कारण ती इतरांबद्दल गॉसिपिंग टाळते आणि कधीही नायकांच्या खोलीत गेली नाही. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्रास दिला जात आहे आणि लक्ष्य केले जात आहे.' असे म्हणत आपण इतर अभिनेत्रींहून कशी वेगळी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे.

इमर्जन्सी या तिच्या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत असलेल्या कंगना रणौतने सांगितले की, की तिला चित्रपट बनवायचा होता आणि यात गमावण्यासारखे काहीही नाही. ती पुढे म्हणाली की, चित्रपटसृष्टी स्वच्छ करणे हा व्यवसायात येण्याचा तिचा उद्देश आहे. 'मी येथे राक्षसांचा नायनाट करण्यासाठी आलो आहे.,' असेही ती अभिमानाने म्हणाली.

कंगना रणौत आगामी तेजस चित्रपटामध्ये भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने नुकतेच तिच्या होम प्रॉडक्शन इमर्जन्सीचे शूटिंग पूर्ण केले. सध्या, कंगना रणौत पी वासू दिग्दर्शित चंद्रमुखी 2 च्या शूटिंगमध्ये गुंतली आहे जो सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका सरवणन स्टारर 2005 रिलीज झालेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

हेही वाचा - Sachin Shroffs Marriage : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेता सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.