ETV Bharat / entertainment

Kalki 2898 AD : प्रभासने शेअर केला दीपिका पदुकोणसोबत काम करण्याचा अनुभव - दीपिका पदुकोणबद्दल बोलताना प्रभास

प्रभास आणि दीपिका पदुकोण 'कल्की २८९८ एडी' या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सॅन दिएगो इथून सुरू झाले आहे. प्रभासने नुकत्याच एका मुलाखतीत दीपिका सोबत काम करण्याच अनुभव शेअर केला आहे.

Kalki 2898 AD
प्रभास आणि दीपिका पदुकोण
author img

By

Published : Aug 3, 2023, 6:21 PM IST

मुंबई - बाहुबली स्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण 'कल्की २८९८ एडी' या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत. दोघेही आपआपल्या फिल्म इंडस्ट्रीतील महान कलाकार आहेत. दीपिका मुळची कन्नड किंवा साऊथ इंडियन असली तरी ती बॉलिवूड चित्रपटाची आघाडीची नायिका आहे आणि प्रभास हा साऊथ स्टार असण्यासोबतच तो पॅन इंडिया चित्रपटांचा सुपरस्टार आहे. दोघेही एकमेकांबद्दल खूप आदर बाळगतात. 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटातील दीपिका सोबत काम करण्याचा अनुभव प्रभासने नुकाताच शेअर केला आहे.

दीपिका पदुकोणबद्दल बोलताना प्रभास म्हणाला, 'दीपिका खूप सुंदर अभिनेत्री आणि मोठी सुपरस्टार आहे. ती आधीपासूनच ग्लोबल लेवलवर प्रसिद्ध आहे. मला वाटते की ती लुई वुइटन, टॅम एडेक्स आणि सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय जाहीराती ती करते. ती जेव्हा सेटवर येते तेव्हा एक वेगळी चमक येत असते. त्यामुळे मला ती खूप आवडते. मला तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पहिल्यांदा मी तिच्यासोबत काम करतोय.'

'कल्की २८९८ एडी' चित्रपट महत्त्वकांक्षी प्रोजेक्टसह भारतीय चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात महागडा भारतीय चित्रपट असल्याचे सांगितले जाते. 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट येत्या वर्षी १२ जानेवरीला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जाणार आहे.

'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा अमेरिकेत सॅन दिएगो कॉमिक कॉन २०२३ च्या भव्य मंचावरुन करण्यात आली. त्या आधी प्रजेक्ट के या नावाने याची निर्मिती करण्यात आली होती. या खास कार्यक्रमाला प्रभास, राणा दग्गुबातीसह कमल हासन हजर होते. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचाचा टीझरही यावेळी लॉन्च करण्यात आला होता. हॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या सिने लेखकांच्या संपामुळे या कार्यक्रमाला दीपिका पदुकोण हजर नव्हती. या चित्रपटात प्रभास आणि दीपिकाला स्क्रिन स्पेस शेअर करताना पाहायला दोघांचेही चाहते आतुर झाले आहेत.

हेही वाचा -

१. Anand Mahindra And Shah Rukh Khan : 'किंग खान आहे १० पट 'जिंदा', 'बंदा' हो तो ऐसा', आनंद महिंद्रांची मिश्कील कमेंट

२. Death Of Mahanor And Nitin Desai : दोन महान प्रतिभावंत हरपले, अजिंठा परिसरावर दुःखाची छाया

३. Gadar 2 New Song Out : 'गदर २' मधील ठेका धरायला लावणारे 'मैं निकला गड्डी लेके' गाणे लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.