ETV Bharat / entertainment

विकी कौशलनं शेअर केला वेदनादायी व्हिडिओ, म्हणतो - 'काल काळीज तुटलं आज शरीर' - विकी कौशलचा आगामी चित्रपट

Vicky Kaushal shares painful video : ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाची ट्रॉफी जिंकण्यात भारतीय संघाला अपयश आल्यानं अनेकजण दुःखी झाले. विकी कौशलनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ टाकला आणि भारतीय संघाप्रमाणेच काळजी तुटल्याचं पोस्टमध्ये लिहिलंय.

Vicky Kaushal shares painful video
विकी कौशलनं शेअर केला वेदनादायी व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 1:10 PM IST

मुंबई - Vicky Kaushal shares painful video : अभिनेता विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये तो व्यायामशाळेत कठीण श्रम केल्यानंतर त्याला चालण्यास त्रास होताना दिसतोय. त्यानं आपल्या या स्थितीची तुलना काल रात्री झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाशी केलीय. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'च्या रिलीजसाठीची तयारी करतोय.

Vicky Kaushal shares painful video
विकी कौशलनं शेअर केला वेदनादायी व्हिडिओ

विकी कोशलनं त्याच्या जिम ट्रेनरला टॅग करत लिहिले: "कल दिल टुटा आज शरीर... पण आम्हाला फक्त बढते चलो इतकंच कळतंय. लेग डे विथ मुस्तफा द बुल अहमद".

Vicky Kaushal shares painful video
विकी कौशलनं शेअर केला वेदनादायी व्हिडिओ

अहमदाबाद येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनल मॅचचासंदर्भ देऊन इथे विकी कौशलनं हार्टब्रेक हा शब्दा वापरलाय. प्रामाणिक प्रयत्न करूनही टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव झाला. 1.4 अब्ज भारतीय यामुळे नाराज झाले. 2011 नंतर भारतीय संघ विश्वचषक ट्रॉफी उचलण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

क्रिकेटचा एक उत्कट चाहता असलेल्या विकी कौशललाही या पराभवाचं दुःख झालंय. त्यामुळे त्यानं व्यायाम शाळेत पायात आलेल्या वेदनेची तुलना भारतीय क्रिकेट संघाच्या दुःखाशी केलीय.

कामाच्या आघाडीवर, विकी कौशल सध्या त्याच्या सॅम बहादूर या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो सॅम माणेकशॉची व्यक्तिरेखा साकारत आहे. यासाठी त्यानं सॅम माणेकशा यांच्या बॉडी लँग्वेजमधील छोटे छोटे बारकावे आत्मसात केले आहेत. एका प्रमोशनल टूरमधून विकी कौशनं इन्स्टाग्रामवर गोरखा योद्ध्यांसोबत खुकुरी नृत्य करतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये तो सहकारी सैनिकांसोबत स्टेप्स फॉलो करताना दिसत असून त्याच्या नृत्त्यात एक सराईत डान्सरची झलक पाहायला मिळतेय.

'सॅम बहादूर' 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर अभिनीत 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाशी त्याच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष होईल. 'सॅम बहादूर' हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मूव्हीज अंतर्गत निर्माण केला आहे.

हेही वाचा -

  1. 'तुम बिन' फेम प्रियांशू चॅटर्जीचा 'हटके' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

2. 'टायगर 3'नं विश्वचषक सामन्याच्या फायनलच्या दिवशी केली 'एवढी' कमाई; जाणून घ्या

3. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर अनुष्का शर्मानं विराटला मारली मिठी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.