ETV Bharat / entertainment

ज्युनियर एनटीआरनं नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोसला जेवणासाठी केले आमंत्रित - नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस

Jr NTR invite Netflix CEO: साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआरनं नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोससोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करून एनटीआरचं कौतुक करत आहेत.

Netflix
नेटफ्लिक्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 10:25 AM IST

मुंबई - Jr NTR invite Netflix CEO : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर हा नेहमीचं चर्चेत असतो. अलीकडेच, त्यानं नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस यांच्यासाठी भव्य जेवणाचे आयोजन केलं होतं. ज्युनियर एनटीआरनं मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी टेड सारंडोसची भेट घेतली. आता त्यांच्या भेटीची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये एनटीआर खूप खूश दिसत आहे. एनटीआरनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं, "तुम्हाला आणि तुमच्या टीमला दुपारच्या जेवणासाठी होस्ट करताना आनंद झाला, टेड सारंडोस आणि आम्ही एकत्र संभाषणाचा आनंद लुटला. आम्ही जेवणादरम्यान दुपार एकत्र घालवली''.

सोशल मीडियावर फोटो शेअर केले : सीईओ टेड सारंडोस यांनी मेगास्टार चिरंजीवी आणि राम चरण यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अचानक भेट दिली होती. ते आपल्या टीमसोबत होते. ज्युनियर एनटीआर देखील टेड सारंडोससाठी जेवण आयोजित करताना खूप आनंदी दिसत आहे. भेटीदरम्यानचे काही फोटो ज्युनियर एनटीआरने शेअर केले असून या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं फोटोवर कमेंट करत लिहिल, ''आता नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार नक्की''. दुसऱ्या एकानं लिहिल, ''ज्युनियर एनटीआर खूप खास व्यक्ती आहे''. आणखी एकानं लिहिलं, '' फोटो खूप खास आहेत''. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

  • It was such a pleasure hosting you and your team for lunch Ted Sarandos. Enjoyed our conversation and the afternoon spent together indulging in our love for movies and food. pic.twitter.com/aD82mcM2MY

    — Jr NTR (@tarak9999) December 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एनटीआरचं वर्कफ्रंट : ज्युनियर एनटीआरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'देवरा' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची निर्मिती एनटीआर आर्ट्स आणि युवा सुधा आर्ट्सच्या बॅनरखाली हरी कृष्ण के आणि मिक्किलीनी सुधाकर यांनी केली आहे. जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सैफ अली खान या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. 'देवरा' हा जान्हवीचा तेलगू चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होईल

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल'ने 7 दिवसात जमवला 563.3 कोटीचा गल्ला, तिकीट बारीवर गर्दी कायम
  2. धर्मेंद्रने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, सनी बॉबीसह 'ड्रीम गर्ल'नेही दिल्या शुभेच्छा
  3. 'यश 19' चे शीर्षक ठरले, निर्मात्यांनी व्हिडिओ लॉन्च करुन दिली अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.