ETV Bharat / entertainment

Jr NTRs monochrome pictures : ज्यु. एनटीआरच्या फोटोशूटमधील मोनोक्रोम फोटोने सोशल मीडियावर वादळ - ज्युनियर एनटीआर

तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी चित्रपट देवाराच्या चित्रीकरणात बिझी आहे. दरम्यान, सुपरस्टारचे पोस्ट-पॅक-अप शॉट्स सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

Jr NTRs monochrome pictures
ज्यु. एनटीआरच्या फोटोशूटमधील मोनोक्रोम फोटो
author img

By

Published : May 27, 2023, 6:47 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार ज्युनियर एनटीआर त्याच्या कारकिर्तीतील सर्वात भरभराटीचा काळ सुरू आहे. एसएस राजामौलीच्या लेटेस्ट आरआरआरमधील त्याच्या अभिनयाची चर्चा ग्लोबल लेव्हलवर झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई करणारा ठरला होता. आरआरआरच्या प्रचंड यशानंतर, ज्युनियर एनटीआर आता इंडस्ट्रीमध्ये त्याच्या 30 व्या चित्रपटाच्या परफॉर्मन्ससाठी सज्ज झाला आहे. देवरा असे शीर्षक असलेल्या चित्रपटाचे शुटिंग गेल्या महिन्यात सुरू झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी, तेलगू सुपरस्टार ज्यु. एनटीआरने प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांच्यासोबत हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पोस्ट-पॅक-अप शॉटसाठी पोज दिली.

ज्यु एनटीआरचे जबरदस्त फोटोशूट - फोटोग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ज्युनियर एनटीआरची काही चित्तथरारक मोनोक्रोम फोटो पोस्ट केले. फोटो शेअर करताना, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'शुटिंगच्या पॅकअपनंतरचे सुपरस्टार ज्यु. एनटीआरचे फोटो. त्याच्या सर्व पर्कारच्या लूकसह असलेले फोटो, काही मिनीटात सर्वकाही मिळाले. मॅन ऑफ मास.' हे फोटो लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात ज्युनियर एनटीआरच्या अनमोल हास्यासह त्याची अनोखी स्टाईल दिसत आहे.

दिग्दर्शक कोरतला सिवा ज्यु एनटीआरचा ३० चित्रपट - आधी कळवल्याप्रमाणे, ज्युनियर एनटीआर प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक कोरतला सिवा यांच्यासोबत त्याच्या ३० वा प्रोजेक्ट देवारासाठी सहयोग करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या तेलुगु पदार्पणाचे प्रतीक असलेला हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये हैदराबादमध्ये एका भव्य पूजा समारंभाने सुरू झाला. देवरा 2024 च्या मध्यापर्यंत तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

वॉर २ मध्ये हृतिक रोशनसोबत झळकणार - ज्युनियर एनटीआर एका जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलरसाठी केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत काम करणार आहे. NTR 31 असे तात्पुरते शीर्षक असलेला हा चित्रपट 2024 च्या उन्हाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुपरस्टार एनटीआर बॉलीवूडमध्ये वॉर 2 मधून हृतिक रोशनसोबत पदार्पण करणे अपेक्षित आहे. ज्युनियर एनटीआर हा तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील मास सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा - IIFA 2023 : सलमान खानच्या अंगरक्षकाने धक्काबुक्की केल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.