मुंबई: काही दिवसांपूर्वी सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) पठाणसाठी उत्तम बॉडी बनवली आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. सुपरस्टार शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट 'पठाण' (Pathan Movie) मधील जॉन अब्राहमचा (John Abrahm) लूक समोर आला आहे. शाहरुखने सोशल मीडियावर एक मोशन टिझर शेअर केला आहे.शाहरुखने सोशल मीडियावर एक मोशन टिझर शेअर केला आहे. त्यामध्ये टाईम बॉम्बचा स्फोट होतो आणि त्यानंतर धूरातून वाट काढत जॉन येताना दिसतो. चित्रपटात जॉन खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर चाहत्यांना जॉनचा हा लूक खूप आवडला आहे.
पठाणमध्ये खलनायकाची भूमिका साकारतोय जॉन अब्राहम: मेकर्सना त्याच्या तोडीचा व्हीलन हवा होता. जॉन ची बॉडी नेहमीच आकर्षक दिसते. तो वर्षभर आपल्या बाॅडीवर मेहनत घेत असतो. पठाणकरिता जॉन आमची पहिली आणि एकमेव पसंती होती' असे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने (Director Siddharth Anand) सांगितले.
जॉन अब्राहमने चाहत्यांना थक्क केले: पठाणच्या टीझरमध्ये जॉन अब्राहमने चाहत्यांना थक्क केले आहे. त्यात तो खलनायकाची भूमिका करत असल्याचे उघड झाले. जॉनला एका अतिशय हटके अवतारात सादर करण्यात आले आहे. हा खलनायक कठोर निर्दयी असून शत्रूच्या विनाशाची इच्छा ठेवणारा आहे. केवळ जॉनच मोठ्या ताकदीने ही भूमिका साकारू शकतो.
पठाणला लार्जर दॅन लाईफ बनवण्यासाठी: सिद्धार्थ म्हणाला, पठाणला लार्जर दॅन लाईफ बनवण्यासाठी, आम्हाला त्याच तोडीचा सशक्त खलनायक पाहिजे होता. जो चुकीला माफ करणारा नसेल. त्यामुळे जॉन अब्राहम डोक्यात ठेवूनच पठाणमधील खलनायक उभा केला. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. हिंदीसह तामिळ आणि तेलुगूमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार आहे.