ETV Bharat / entertainment

Jaya Bachchan returns: पापाराझींवर भडकल्या मॅडम, नेटिझन्स म्हणतात 'जया बच्चनको इतना गुस्सा क्यूँ आता है?' - Jaya Bachchan returns

पापाराझींसोबत जया बच्चन यांचे नाते काही फार सख्याचे नाही. अनेकवेळा दोघांमध्ये खटके उडाले आहेत. रॉकी ऑर रानी की प्रेम कहानीच्या स्क्रिनिंगला याच्या पुन्हा अनुभव आला. चिडलेल्या जया बच्चन यांना पाहून नेटिझन्स म्हणतात, 'जया बच्चन रिटर्न्स.'

Jaya Bachchan returns
पापाराझींवर भडकल्या जया बच्चन मॅडम
author img

By

Published : Jul 26, 2023, 12:36 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन मंगळवारी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आली होती. यावेळी फोटोसाठी हाक मारणाऱ्या पापाराझींना उद्देशून ती म्हणाली की, मी बहिरी नाही. चिडलेली जया बच्चन पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' खास स्क्रिनिंग सेलेब्रिटींसाठी आयोजित करण्यात आले होते. यासाठी जया बच्चन यांनी थिएटरमध्ये एन्ट्री केली तेव्हा पापाराझींनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकजण सेलेब्रिटींना क्लिक करण्यात गुंतला होता. जयाच्या मागून त्यांची मुलगी श्वेता आणि अभिषेक बच्चन येत होते. मिळून पुढे जायचे म्हणून जया थोडावेळ थांबल्या होत्या. इतक्यात पापाराझींनी मोठ मोठ्याने त्यांना हाक मारुन फोटोसाठी विनंती केली. मात्र त्यांना असे बोलवणे आवडले नाही. जय बच्चन म्हणाल्या, 'आय एम नॉट ए डीफ. चिल्लाओ मत, आराम से बात करो.' त्यानंतर श्वेता आणि अभिषेक जयाकडे चालत आले आणि तिघे मिळून थिएटरमध्ये निघून गेले.

पापाराझींवर भडकण्याची जया बच्चन यांची ही पहिली वेळ नाही. ती एक खडूस सेलेब्रिटी असल्याचे सर्व पापाराझींना चांगलेच ठाऊक आहे. जया बच्चन यांचा हा व्हिडिओ पापाराझी इन्स्ट्ग्राम अकाउंटवर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 'जया बच्चनको इतना गुस्सा क्यूँ आता है?', असेही काहींनी प्रश्न केला आहे. काहींना त्या व्हिलेन, तर काहींना सक्त स्कूल टीचर वाटतात, अशात एका युजरने लिहिलंय, 'जया बच्चन रिटर्न्स.'

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूड सेलेब्रिटींची मांदियाळी जमली होती. यात रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीश्मा कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, नेहा धुपिया,सारा अली खान, अनन्या पांडे, इब्राहिम अली खान आणि चंकी पांडे या सेलेब्रिटींचा समावेश होता. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबान आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २८ जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील तुम क्या मिलें, वे कामलेया आणि धिंडोरा बाजे रे ही गाणी रिलीज झाली आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

हेही वाचा -

१. Mi 7 Box Office Collection Day 14 :'ओपेनहाइमर' आणि 'बार्बी' चित्रपटामुळे 'मिशन इम्पॉसिबल ७'च्या कमाईत घसरण...

२. Kiara Advani : इंडिया कॉउचर वीकमध्ये कियारा अडवाणीने सासूला दिले फ्लाइंग किस...

३. Narayan Murthy Video : करीना कपूरच्या अहंकाराबद्दल नारायण मूर्तींनी सुनावले खडे बोल, व्हिडिओ पुन्हा व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.