ETV Bharat / entertainment

Jawan trailer date locked: शाहरुखने शेअर केली 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक, 'रक्षा बंधना'ला होणार मोठा धमाका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 7:58 PM IST

'जवान' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत असलेल्या चाहत्यांना शाहरुखने 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक शेअर करत गाणे उद्या रिलीज होणार असल्याचे कळवले आहे. दरम्यान ट्रेलरची प्रतीक्षा सुरू असून ३१ ऑगस्ट रोजी रक्षा बंधनाच्या दिवशी जवानचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे.

Jawan trailer date locked
शाहरुखने शेअर केली 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक

मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा करत आहेत. मात्र किंग खानने त्यांना आश्चर्याचा धक्का देत ट्रेलर ऐवजी 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक शेअर केली आहे. अलीकडे पोस्ट केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये शाहरुखने 'रमैय्या वस्तावैया' गाण्याच्या रिलीझ तारखेची घोषणा करणारा एक टीझर शेअर केला आहे. शाहरुख खान या गाण्याच्या झलकवर बेभान होऊन थिरकताना दिसत आहे.

सोशल मीडियावर शाहरुखने कोरिओग्राफर वैभवी मर्चंटचे या गाण्यातील हटके स्पटेप्सबद्दल आभार मानले आहेत. शाहरुखने पोस्टमध्येमिश्किल भाषेत लिहिलंय, 'ही पोस्ट रमैय्या वस्तावैय्या बद्दल नाही, तर वैभवी मर्चंटने माझे दोन डावे पाय सहन केल्याबद्दल तिचे आणि अनिरुद्धही आभार मानायचे आहेत.' पुढे त्याने म्हटलंय की, 'रमैय्या वस्तावैय्या हे गाणे उद्या प्रदर्शित होईल'. 'जवान' हा शाहरुखचा बहुप्रतीक्षित चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. गाण्याच्या टीझरमध्ये शाहरुख खान काळ्या रंगाच्या कपड्यात उत्साही पार्टीमध्ये स्टायलिश स्टेप्स करताना दिसत आहे.

'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' ही दोन गाणी यापूर्वी रिलीज करण्यात आली आहेत. ट्विटरवरील सत्रात चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, शाहरुखने गाणे आधी की ट्रेलर आधी? याचे उत्तर मिष्किलपणे दिले. शाहरुख म्हणाला की, 'ट्रेलर शिवाय लोक चित्रपट पाहतील काय? सध्या ट्रेलरवर काम सुरू आहे आणि लवकरच त्याचे प्रदर्शन होईल.' दरम्यान, चित्रपटाच्या टीमच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर ३१ ऑगस्टला प्रदर्शित केला जाणार आहे. या दिवशी रक्षा बंधन सण असल्यामुळे ही एक अनोखी गिफ्ट चाहत्यांसाठी शाहरुख देणार असल्याचे समजते.

अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच काम करत असून संपूर्ण भारतभर विविध भाषेत रिलीज होणार असलेल्या या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय जवानमध्ये सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोग्रा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा यांच्यासह दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'जवान' चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ३१ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ट्रेलरकडे चाहते डोळे लावून थांबले आहेत.

हेही वाचा -

१. Subhedar First Week End Bo : 'सुभेदार' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात दमदार कमाई

२. Jailer box office collection:रजनीकांतच्या 'जेलर'चा बॉक्स ऑफिसवर १९ व्या दिवशीही दबदबा कायम

३. Gadar 2 vs OMG 2 box office day 18: 'गदर 2'च्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर घसरतेय 'ओ माय गॉड 2'ची कमाई....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.