ETV Bharat / entertainment

Jawan stuntman praised SRK : 'जवान'च्या प्रत्येक अ‍ॅक्शननंतर शाहरुख स्टंटमॅनची करायचा विचारपूस - Shah rukh khan

शाहरुखचा बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन फिल्म जवान सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील एका स्टंटमॅन सद्दामने किंग खानचे जोरदार कौतुक केले आहे. शाहरुख त्याची कशी काळजी घेत असे, याबद्दल त्याने सांगितले आहे.

Jawan stuntman praised SRK
शाहरुख स्टंटमॅनची करायचा विचारपूस
author img

By

Published : Jun 22, 2023, 7:57 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माते अ‍ॅटली कुमार यांचा आगामी 'जवान' हा या वर्षीचा सर्वात जास्त प्रतीक्षा असलेला चित्रपट आहे. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल आणि यामध्ये बरेच स्टंट पाहायला मिळतील. जवान चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच यात काम करणाऱ्या स्टंटमनने खुलासा केला आहे की, स्टंट सीन्स केल्यानंतर शाहरुख खान त्याला त्याची तब्येत विचारण्यासाठी यायचा.

शाहरुख खान आपल्या प्रत्येक स्टाईलने सर्वांची मनं जिंकतो. यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील स्टंटमॅनचे कौतुक केले आहे. सद्दाम एक अ‍ॅक्शन स्टार-डान्सर आहे जो डान्स दीवाने या चित्रपटामध्ये देखील दिसला होता. हाच सद्दाम 'जवान' चित्रपटामधील स्टंटमॅन आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, प्रत्येक शॉटनंतर शाहरुख त्याची तपासणी करायचा आणि तो बरा आहे का असे विचारायचा. सद्दामने काही चूक केली असती तर त्याचा दोष शाहरुख स्वतःवर घ्यायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, सद्दामने शाहरुख खानला 'सर्वात प्रिय व्यक्ती' म्हटले होते. तो म्हणाला, 'मी ज्या कलाकारांसोबत काम करतो ते सहसा असभ्य असतात, पण शाहरुख तसा नाही. प्रत्येक वेळी त्याने मला विचारले की मी तो स्टंट कसा करणार आहे, त्यानंतर त्याने सुरक्षा देखील तपासली. मला दुखापत होईल अशी भीती त्याला वाटत होती.' स्टंटमॅन सद्दामने दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. आपल्याला हिरो पडद्यावर जबरदस्त स्टंट करत असताना भारी वाटते. आपण मनातून त्याला भरपूर दाद देत असतो. पण त्यामागे केवळ कष्टच नाही तर आपला जीव धोक्यात घालून हे स्टंटमॅन काम करत असतात.

'जवान' हा अ‍ॅटली लिखित आणि दिग्दर्शित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात शाहरुख खानसोबत विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रियामणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नयनताराचा हा हिंदी डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणचा एक कॅमिओ देखील असेल, ज्याचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे. जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

१. Dholkichya Taalavar new season : नव्या लावणी सम्राज्ञीची निवड करण्यासाठी येतोय 'ढोलकीच्या तालावर'चा नवा हंगाम!

२. Bawaal at the Eiffel Tower: वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'बवाल'चा आयफेल टॉवरवर होणार प्रीमियर

३. Raveena Tandon Daughter Song : रवीना टंडनची मुलगी राशा निघाली छुपी रुस्तम; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.