ETV Bharat / entertainment

Jawan song Chaley: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील दुसरे गाणे होणार लवकरच प्रदर्शित...

author img

By

Published : Aug 12, 2023, 2:45 PM IST

शाहरुख खान, नयनतारा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा' या गाण्यानंतर आता अरिजित सिंगने गायलेले या चित्रपटातील दुसरे गाणे 'चले' प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात शाहरुखबरोबर नयनतारा झळकणार आहे.

Jawan song Chaley
जवान चित्रपटाचे चले गाणे

मुंबई : सध्या शाहरुख खान आणि नयनतारा त्यांच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'जिंदा बंदा' या ट्रॅकच्या रिलीजनंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर, 'जवान' टीम आता येत्या आठवड्यात 'चले' नावाचे दुसरे गाणे सादर करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असून आता 'जवान'चे दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या गाण्याला अरिजित सिंग आणि शिल्पा रावने आवाज दिला असून शाहरुख या गाण्यात नयनताराबरोबर रोमान्स करताना दिसणार आहेत.हे गाणे कधी रिलीज होणार? याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नयनतारासोबत शाहरुखचा रोमान्स! : 'जवान' चित्रपटातील 'जिंदा बंदा' हे पहिले गाणे रसिकांच्या पसंतीस उतरले असून आता या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीजसाठी सज्ज झाले आहे. त्याचबरोबर शाहरुख खान आणि नयनतारा या गाण्यात रोमान्स करताना दिसत आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली आहे. पहिल्या गाण्यापेक्षा या गाण्याला जास्त प्रतिसाद मिळेल अशी आशा मेकर्स करत आहे.

'चले' सोमवारी प्रदर्शित होणार : 'जवान' चित्रपटातून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओसोबत 'जवान'ची क्रेझ अधिकच वाढत चालली आहे. या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूला देखील प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. याशिवाय 'जिंदा बंदा' या हिट गाण्यासह या चित्रपटाचे पोस्टर्स पण एक आता चर्चेचा विषय बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते येत्या सोमवारी 'चले' हे रोमँटिक गाणे घेऊन येणार आहेत. याशिवाय हे गाणे किंग खानचे सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाणे असेल, अशी अपेक्षा आता केली जात आहे.

'जवान' ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार : चित्रपटाचे पहिले गाणे 'जिंदा बंदा' हे तीन भाषांमध्ये रिलीज झाले होते, 'चले' गाणे देखील हिंदीसह तमिळ आणि तेलुगु आवृत्तीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'जवान' चित्रपट हा 'रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन'च्या बॅनरखाली बनलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अ‍ॅटली यांनी केले आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा सह-निर्मित हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : 'रॉकी और रानी...' ने पार केला २५० कोटींचा आकडा, देशा विदेशात वाजतोय यशाचा डंका
  2. Sara Ali Khan Birthday Special: मेहनतीच्या जोरावर सारा अली खानने घेतली गगनभरारी...
  3. Jaya Prada : अभिनेत्री जयाप्रदा यांना ६ महिन्यांची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.