ETV Bharat / entertainment

Jawan final trailer : 'जवान' चित्रपटाचा अंतिम ट्रेलर होणार या आठवड्यात प्रदर्शित... - नयनतारा

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा अंतिम ट्रेलर या आठवड्यात प्रदर्शित होईल. या चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरतेने पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Jawan final trailer
जवानचे अंतिम ट्रेलर
author img

By

Published : Aug 21, 2023, 6:17 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा 'पठाण' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याच्या मूडमध्ये आहे. किंग खानच्या 'पठाण' चित्रपटाने रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली होती. दरम्यान आता शाहरुख हा 'जवान' चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर वादळ आणण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जवान' हा चित्रपट रिलीज होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत, तर आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर येत आहे. या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर येत्या बुधवारी किंवा गुरुवारी रिलीज होऊ शकतो. चाहते चित्रपटाच्या अंतिम ट्रेलरची वाट आतुरतेने पाहत आहेत.

'जवान' चित्रपटाचा अंतिम ट्रेलर होणार प्रदर्शित : 'जवान' चित्रपटाच्या टीझर, पोस्टरसह 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' ही दोन गाणी रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. काही दिवसापूर्वी 'जवान'चा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. हा प्रीव्ह्यू प्रेक्षकांना खूप पसंत पडला. या प्रीव्ह्यूच्या पोस्टवर अनेकजणांनी कमेंट करत चित्रपटाबद्दल कौतुक केलं होतं. आता या आठवड्यातच 'जवान'चा अंतिम ट्रेलर प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षक खूप उत्साहित झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर 'जवान'बद्दल चर्चा होताना दिसत आहे. 'जवान'चा ट्रेलर हा निर्माते चेन्नईमध्ये लाँच करणार आहेत.

'जवान' चित्रपटाबद्दल : 'जवान' हा चित्रपट साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ​​ऍटली यांनी बनवला आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून संजय दत्त आणि दीपिका पदुकोण कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा ​​आणि साऊथ अभिनेत्री प्रियमणी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. 'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान आता 'जवान'बाबत खूप क्रेझ आहे. त्यामुळे हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप कमाई करेल असे सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
  2. jailer box office collection day 11 : 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर पार केला ५०० कोटीचा टप्पा...
  3. Sunny Deol And Akshay Kumar : अक्षय कुमारने सनी देओलचं घर लिलावापासून वाचवलं? काय आहे सत्य जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.