ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan's birthday:'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं शाहरुख खानला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; म्हटलं लव्ह यू सर... - Shah Rukh Khan 58th birthday

Shah Rukh Khan's birthday: शाहरुख खानला 58 व्या वाढदिवसानिमित्त, 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यानं 'जवान' चित्रपटाच्या सेटवरील कुठेही प्रसिद्ध न झालेला फोटो शेअर केला आहे.

Shah Rukh Khans birthday
शाहरुख खानचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 2:23 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan's birthday: शाहरुख खान 2 नोव्हेंबर रोजी आपला 58वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर चाहत्यांकडून आणि स्टार्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान हा दिवस 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीसाठी खूप खास आहे. अ‍ॅटलीनेही शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं 'जवान'च्या सेटवरील सोशल मीडियावर आजवर प्रसिद्ध न झालेला फोटो शेअर केला आहे. अ‍ॅटलीनं 'विक्रम राठौर'च्या पात्र (शाहरुख खान ) सोबतचा स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर करून किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये अ‍ॅटली आणि शाहरुख डॅशिंग दिसत आहेत.

साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटलीनं शेअर केला फोटो : अ‍ॅटलीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं, 'माझ्या प्रिय शाहरुख सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, लव्ह यू सर'. साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटलीनं पहिल्यांदाच शाहरुख खानबरोबर काम केलं आहे. त्यानं 'जवान' चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं देखील पैसे गुंतवले आहेत. 'जवान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं देशातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला होता. 'जवान' चित्रपटामध्ये किंग खानसोबत नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, योगी बाबू आणि रिद्धी डोगरा हे कलाकार दिसले आहेत.

'जवान' होणार ओटीटीवर प्रदर्शित : शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी मध्यरात्री ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'जवान' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. याशिवाय, किंग खाननं त्याच्या वाढदिवशी त्याच्या आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी'चा टीझरही रिलीज केला आहे. हा टीझर प्रेक्षकांना खूप पसंत पडला आहे. किंग खाननं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण टीझर आणि चित्रपटाबद्दल कौतुक करताना दिसत आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'डंकी' हा चित्रपट 'जवान'प्रमाणेच कमाई करणार असा या चित्रपटाच्या टीझरवरून अंदाज लावला जात आहे.

हेही वाचा :

  1. Varun and lavanya marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर
  2. Happy birthday SRK : शाहरुखचा थक्क करणारा अष्टपैलू प्रवास, रोमान्स किंग बनला अ‍ॅक्शन स्टार
  3. Dunki teaser released : शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'डंकी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी किंग खान सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.