ETV Bharat / entertainment

Jawan Box Office Collection Day ११ : शाहरुख खान स्टारर 'जवान' लवकरच बॉक्स ऑफिसवर 500 कोटीचा टप्पा ओलांडणार...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 12:53 PM IST

Jawan box office collection day 11: शाहरुख खानचा अ‍ॅक्शन थ्रिलर 'जवान' चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप नोटा छापत आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. 'जवान' चित्रपट अकाराव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करू शकतो हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jawan box office collection day 11
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

मुंबई - Jawan Box Office Collection Day 11: शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं गेल्या वीकेंडला प्रचंड कमाई केली होती आणि एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला होता. 'जवान' आता दुसऱ्या वीकेंडमध्ये देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटानं नवव्या दिवशी 400 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार केला. 'जवान'नं प्रचंड जलद गतीनं बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.

जवानचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'जवान'नं जागतिक बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट दररोज नवे विक्रम रचत आहे. 'जवान' चित्रपटानं ओपनिंग डेला 75 कोटाचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी , पाचव्या दिवशी 32.92 कोटी, सहाव्या दिवशी 26 कोटी, सातव्या दिवशी 23.2 कोटी, आठव्या दिवशी 21.6 कोटी आणि नव्या दिवशी 21 कोटी आणि 'जवान' 10 व्या दिवशी 31.50 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि यासोबतच चित्रपटाचं एकूण कलेक्शन 440.48 कोटी रुपये झाले आहे. हा चित्रपट अकराव्या दिवशी 35 कोटी कमाई करू शकतो. यासह चित्रपटाचं एकूण कलेक्शन 474.89 कोटी होईल.

'जवान'ची सक्सेस पार्टी : 'जवान'च्या निर्मात्यांनी नुकतेच मुंबईत 'जवान' चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये किंग खान दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, अ‍ॅटली आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि चित्रपटामधील इतर काही कलाकार उपस्थित होते. या पार्टीमध्ये नयनतारा अनुपस्थित होती. या पार्टीमध्ये 'जवान' टिमनं खूप एन्जॉय केला. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'जवान'नंतर आता किंग खान त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटात दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'डिंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट असेल. या चित्रपटात तापसी पन्नू त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

हेही वाचा :

  1. Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रानं पती निक जोनासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट केली शेअर...
  2. Parineeti chopra : परिणीती चोप्रानं काढला पापाराझीवर राग ; व्हिडिओ व्हायरल...
  3. Akshay kumar and Rohit shetty : अक्षय कुमार दिसणार रोहित शेट्टीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.