ETV Bharat / entertainment

Jawan advance booking: रिलीजपूर्वी 'जवान'ने केली 26 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई... - शाहरुख खान

Jawan Advance Booking : 'जवान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 26 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. अ‍ॅटली दिग्दर्शित, अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Jawan advance booking
जवान अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 2:46 PM IST

मुंबई - Jawan Advance Booking : 'पठाण'नंतर आता शाहरुख खान 'जवान' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनं जिंकण्यासाठी येतोय. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळतेय. वर्षाच्या सुरुवातीला शाहरुखने 'पठाण' चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन साजरं केलं आणि बॉलिवूड चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कमाई केली. 'जवान' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरून वाटतंय कीहा चित्रपट 'पठाण'चे रेकॉर्डही लवकरच मोडेल. 'जवान'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

अ‍ॅडव्हान्स बुकिंग : इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्क रिपोर्टनुसार, 'जवान'ने पहिल्या दिवसाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्व हिंदी चित्रपटांचा विक्रम मोडला असेल असा अंदाज वर्तवला जातोय. एका चित्रपट व्यापार विश्लेषकाच्या मते, शाहरुख खानच्या या चित्रपटाची पहिल्या दिवशी जवळपास 1 दशलक्ष तिकिटविक्री झालीय. दरम्यान आता एका रिपोर्टनुसार, 'जवान'ची सात लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. या चित्रपटाने देशांतर्गत 26.45 कोटी रुपयांची कमाई केलीय. 'जवान' हिंदी 2D मार्केटमध्ये 8,45,594 तिकिटे विकण्यात यशस्वी झाला आहे. 'जवान'ने आयमॅक्स स्क्रीनिंगसाठी 14,683 तिकिटे विकली. मंगळवारी, व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. राष्ट्रीय मल्टिप्लेक्स पीव्हीआर (PVR) 1,51,278, आयनोक्स (INOX) - 1,06,297 आणि सिनेपोलिस CINEPOLIS - 52,615 यांनी इतकी तिकिटं विकली आहे. यासह या चित्रपटाची एकूण 3,10,190 विकली गेली आहे. इंडिया वाइड ऑल थिएटरने आतापर्यत 7,27,200 तिकिटं विकली आहे.

'जवान'ची स्टारकास्ट : अ‍ॅटली दिग्दर्शित आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित, 'जवान'मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, योगी बाबू आणि रिद्धी डोगरा यांच्याही भूमिका आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Jawan Movie : जवान'च्या ऑफलाइन तिकिट खरेदीसाठी लागल्या लोकांच्या रांगा...

Jackie Shroff : 'इंडिया' विरुद्ध 'भारत' वादावर अभिनेता जॅकी श्रॉफची सूचक प्रतिक्रिया, म्हणाला...

Dream girl 2 box office collection 12 : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट 12व्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.