मुंबई - Jawan advance booking बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची सिने विश्वात हवा निर्माण झाली आहे. बहुप्रतीक्षित असलेला हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजआधी शाहरुख खान प्रमोशनच्या निमित्ताने दुबईत दाखल झाला. याठिकाणी त्याने जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे.
-
The atmosphere at Reel Cinemas in Dubai was every bit electrifying! 💥
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Advance bookings now open, book your tickets: https://t.co/B5xelUahHO#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/d2thSFNcgU
">The atmosphere at Reel Cinemas in Dubai was every bit electrifying! 💥
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) September 1, 2023
Advance bookings now open, book your tickets: https://t.co/B5xelUahHO#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/d2thSFNcgUThe atmosphere at Reel Cinemas in Dubai was every bit electrifying! 💥
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) September 1, 2023
Advance bookings now open, book your tickets: https://t.co/B5xelUahHO#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/d2thSFNcgU
अॅटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटाच्या प्रॉडक्शन बॅनरने आपल्या ट्विटरवर लिहिले की, 'दुबईतल्या रील थिएटरमधील वातावरण फारच उत्सहवर्धक होते. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. तुमचे तिकीट बुक करा. जवान चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगात हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे.'
'जवान'च्या ओपनिंग डेचे प्रोजेक्शन आधीच इंडस्ट्रीमध्ये वितरीत झाले आहे. यामध्ये चित्रपटात सर्वाधिक कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'पठाण' चित्रपटाच्या आठ महिन्यानंतर 'जवान' चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर तिकीटे खपली आहेत. प्री बुकिंगमध्ये 'जवान'चे बुकिंग 'पठाण'ला मागे सारू शकते. पहिल्या दिवशी १.१७ लाख तिकीटे विकली गेली आहेत.
-
#Jawan ADVANCE BOOKING STATUS: EXTRAORDINARY TRENDS!
— taran adarsh (@taran_adarsh) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
NOTE: Tickets sold for *Thu* / *Day 1* at NATIONAL CHAINS… Update: Fri, 2.45 pm
⭐️ #PVR + #INOX: 66,000
⭐️ #Cinepolis: 13,500
⭐️ Total: 79,500 tickets sold#SRK #Nayanthara #VijaySethupathi #DeepikaPadukone
">#Jawan ADVANCE BOOKING STATUS: EXTRAORDINARY TRENDS!
— taran adarsh (@taran_adarsh) September 1, 2023
NOTE: Tickets sold for *Thu* / *Day 1* at NATIONAL CHAINS… Update: Fri, 2.45 pm
⭐️ #PVR + #INOX: 66,000
⭐️ #Cinepolis: 13,500
⭐️ Total: 79,500 tickets sold#SRK #Nayanthara #VijaySethupathi #DeepikaPadukone#Jawan ADVANCE BOOKING STATUS: EXTRAORDINARY TRENDS!
— taran adarsh (@taran_adarsh) September 1, 2023
NOTE: Tickets sold for *Thu* / *Day 1* at NATIONAL CHAINS… Update: Fri, 2.45 pm
⭐️ #PVR + #INOX: 66,000
⭐️ #Cinepolis: 13,500
⭐️ Total: 79,500 tickets sold#SRK #Nayanthara #VijaySethupathi #DeepikaPadukone
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवलानुसार कमी कालावधीत चित्रपटाने ४.२६ कोटींची अॅडव्हान्स बुकिंग पार केली आहे. भारतातही अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होताच ११८२० तिकीटे झटपट विकली गेली आहेत. 'जवान' चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई विस्मयकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत सांगितले की, 'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगचा ट्रेंड विलक्षण असा आहे. नॅशनल चेनमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी झालेल्या तिकीट विक्रीच्या अपडेटनुसार एकूण ७९,५०० तिकीटे विकली गेली आहेत.
शाहरुखच्या समर्पित फॅन पेजने ८५ हजार चाहत्यांसाठी अनेक शो आयोजित करण्याची योजना आखली आहे. यामध्ये तीनशेहून अधिक शहरात चाहते पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी तयार आहेत. सुमारे ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला 'जवान' चित्रपट देशभरात तब्बल सहा हजार स्क्रिन्सवर झळकणार आहे.
हेही वाचा -
३. Aparna Nair Found Dead At Home : केरळमधील घरी मृतावस्थेत आढळली अभिनेत्री अपर्णा नायर