ETV Bharat / entertainment

Jawan Advance Booking : निवडक थिएटर्समध्ये १५ मिनीटात संपली जवान अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे, तिकीट खिडकीवर नोटांचा पाऊस

Jawan Advance Booking : मुंबईतील काही निवडक थिएटर्समध्ये जवान चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे विकण्यात आली. केवळ १५ मिनीटातच तिकीट संपल्याचेी माहिती आहे. २५० ते २००० रुपयापर्यंतच्या तिकीटांची विक्री झाली आहे.

Jawan Advance Booking
जवान अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 8:06 PM IST

Jawan Advance Booking : मुंबई - शाहरुख खानने ठाम ठरवून टाकलं आहे की २०२३ हे वर्ष किंग खानचे आहे. वर्षाची सुरुवात 'पठाण'च्या धमाक्याने केल्यानंतर त्याचा अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पद्धतशीर प्रमोशन सुरू होते. आज त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता अधिक दुणावली आहे. गेल्या काही काळात बॉलिवूड चित्रपट रिलीज होणार असला की त्यातील त्रूटी शोधून ट्रोल करण्याचा पायंडा पडत चालला होता. याचा अनेकदा फटका बॉलिवूडसह इतर चित्रपटांनाही बसला. अगदी चित्रपटावर बहिष्कार घालण्याच्या मोहीमाही चावलल्या गेल्या. यातील कोणत्याही वादात 'जवान' चित्रपट अडकणार नाही याची खात्री निर्मात्यांनी बाळगल्याचे जवानचा ट्रेलर पाहून पटते

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'जवान' चित्रपटाचे प्रदर्शन जवळ येत असताना त्याचा अ‍ॅडव्हान्स बुकिंगचीही जोरदार चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या अ‍ॅप्सवर बुकिंगची सुविधा उपलबद्ध होणार आहे. मुंबईतील पीव्हीआर आयकॉन( लोअर परेल ) पीव्हीआर ल्यूक्स आणि पीव्हीआर इन्फिनिटीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. या थिएटर्समधील अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे संपली असल्याचे समजते. या ठिकाणी 'जवान' चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज होणार आहे. बुक माय शोवर ४ लाख तिकीटांचा विक्री झाली झाली आहे. 'जवान' चित्रपटाचा तिकीट दर २५० रुपयांपासून २००० रुपयापर्यंत आहे. हा प्रतिसाद जवानच्या भवितव्याची नांदी ठरवणारा आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार अमेरिकेत 'जवान'ची १०४३० तिकीटांची विक्री झाली आहे. 'जवान' चित्रपटाला अमेरिकेत 'पठाण'हूनही अधिक ओपनिंग मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलियामध्येही तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. भारतातही 'जवान'ची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्लीत 'जवान' चित्रपटाची अ‍ॅडव्हन्स बुकिंग अद्याप सुरू झालेली नाही. मुंबईत २७ ऑगस्ट पासूनच मोजक्या थिएटर्समध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली. मात्र केवळ १५ मिनीटातच सर्व तिकीचांची विक्री झाली.

हेही वाचा -

१. Dream Girl 2 box office day 7: 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट लवकरच गाठेल देशांतर्गत 70 कोटीचा टप्पा...

२. Tamannaah Bhatia Maldives vacay : तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर मालदीव व्हॅकेशनमधील फोटो केली शेअर...

३. Rakhi Sawant : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत उमराहून मुंबईत परतली; व्हिडिओ झाला व्हायरल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.