ETV Bharat / entertainment

अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव

author img

By PTI

Published : Dec 11, 2023, 5:10 PM IST

Padmapani Lifetime Achievement Award to Javed Akhtar : पूर्वीच्या औरंगाबाद शहरात दरवर्षी होणारा आंतरराष्ट्री फिल्म पुरस्कार सोहळ्याचं नाव अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सव असं ठेवण्यात आलं आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ कवी आणि गीतकार -पटकथाकार जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Padmapani Lifetime Achievement Award to Javed Akhta
जावेद अख्तर यांचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव

मुंबई - Padmapani Lifetime Achievement Award to Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर यांना अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘काला पत्थर’ आणि ‘मिस्टर इंडिया’ यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिजात चित्रपटांचे सहलेखक अख्तर यांना भारतीय चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या नवव्या आवृत्तीच्या उद्घाटनाच्या दिवशी, एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

3 जानेवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठ परिसरातील रुक्मिणी सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची घोषणा अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी केली. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, हिंदी कवी अशोक वाजपेयी, चित्रपट समीक्षक लतिका पाडगावकर, चित्रपट निर्माते अशोक राणे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पद्मपाणी स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपयांचा आर्थिक पुरस्कार असा या सन्मानामध्ये समावेश आहे. अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवाला पूर्वी औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एआयएफएफ) म्हटले जात होते. दरवर्षी नाथ ग्रुप, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या सहकार्याने हा चित्रपट सोहळा आयोजित केला जातो.

अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सवाचा उद्देश

छत्रपती संभाजीनगर शहर आणि तेथील चित्रपट रसिकांना अलीकडे आणि गतकाळात, भारतात आणि जगाच्या इतर भागांमध्ये निर्मित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. हा महोत्सव महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार आणि तरुण चित्रपट रसिकांसाठी एक व्यासपीठ आहे, ज्यामुळे त्यांना सिनेमाच्या कलात्मक तसेच तांत्रिक बाबी शिकण्यास आणि समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जाते. महाराष्ट्र राज्यातील चित्रपट निर्मिती केंद्र, सांस्कृतिक केंद्र अशा अनेक संधींसाठी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा हे शहर आणि प्रदेश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे माध्यम बनवण्याचाही या महोत्सवाचा उद्देश आहे.

हेही वाचा -

1. 'अ‍ॅनिमल'मधील वैवाहिक बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणाबाबत बॉबी देओलनं दिली 'ही' प्रतिक्रिया

2. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची जगभरात झाली 700 कोटींची कमाई

3. प्रभासच्या 'सालार भाग 1 : सीझफायर'ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळालं 'ए' प्रमाणपत्र

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.