ETV Bharat / entertainment

Kiran Mane about Manoj Jarange : 'सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे जरांगे पाटीलांनी दाखवून दिलं' : किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Kiran Manes post

Kiran Mane about Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचं समर्थन मराठी अभिनेता किरण माने यांनी केलंय. 'या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय,' असे त्यांनी मनोज जरांगेबद्दल म्हटलंय. किरण मानेंच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Kiran Mane about Manoj Jarange
किरण मानेंची पोस्ट चर्चेत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 11:53 AM IST

मुंबई - Kiran Mane about Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तब्येत खालावली असतानाही जरांगे पाटील या आंदोलनावर ठाम आहेत. राज्यभरात आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक होत असताना समाजाच्या सर्वच थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. राजकीय विषय जेव्हा येतो तेव्हा मराठी कलाकार मात्र स्पष्ट भूमिका घेताना सहसा दिसत नाहीत. याला अपवाद नेहमीच ठरत आलाय अभिनेता किरण माने. किरणने एक फेसबुकवर पोस्ट लिहून मनोज जरांगेंच्या लढाऊपणाला सलाम केलाय.

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणार्‍या व्यवस्थेला तो धाक 'दाखवण्याचं' महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे.'

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

किरण मानेंनी लिहिलेल्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. सिने सृष्टीमधील पहीलीच पोस्ट , धन्यवाद किरणजी माने ! समाज तुमच्यापण पाठीशी असेलच, बाकी सिनेसृष्टी झोपली वाटतं असो!, असं प्रशांत शिंगटे यांनी म्हटलंय. 'तर, किरणजी या विषयावर तुम्ही सातत्याने लिखाणातून वाचा फोडावी ही प्रांजळ अपेक्षा..', असंही एकानं लिहिलंय. अनिल कुंजीर यांनी लिहिलंय, 'मनोज जरांगे पाटील सारख्या गावखेड्यातील सर्व साधारण कुटुंबातील व्यक्तीने उपोषणाद्वारे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणत... सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकांना अक्षरशः घाम फोडला आहे.. हे सर्वांनाच मान्य करावेच लागेल..संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढवय्या, जिद्दी,त्यागी वृत्तीला सलाम...'

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी पत्र देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समिती गठीत केली आहे. ही समिती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अहवाल राज्य सरकारला देणार आहे. तेलंगाणा राज्यात विधानसभेच्या निवडणूक असल्यामुळे सरकारी निजामकालीन नोंदी व कागदपत्रं मिळण्यास विलंब होत असल्याचं शिंदे समितीचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत शिंदे समितीला राज्य सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा -

  1. Ananya Panday Birthday : सुहाना खान आणि शनायानं 'बेस्टी' अनन्याला दिल्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा

2. Urfi Javed : उर्फी जावेदनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची केली कॉपी...

3. Chiyaan 62 : तमिळ स्टार चियान विक्रमनं केली 'चियान 62' चित्रपटाची घोषणा ; व्हिडिओ केला पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.