ETV Bharat / entertainment

Janhvi Kapoor wishes Shikhar Pahariya : जान्हवी कपूरने कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Shikhar Pahariya o

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या कथित प्रियकर शिखर पहारिया याच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक खास बर्थडे नोट शेअर केली आहे. जान्हवीने 'हॅपी बर्थडे शिखू' अशा संदेशासह त्यांचा एकत्रीत फोटोही पोस्ट केला आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया
जान्हवी कपूरने कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Apr 3, 2023, 6:30 PM IST

मुंबई - जान्हवी कपूरने तिचे नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केल्याचे दिसते. बॉलिवूडच्या या सुंदर अभिनेत्री असलेल्या जान्हवीने तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाला त्यांचा एकत्र फोटो पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने स्वतःचा आणि पहारियाचा एकत्र फिरतानाचा एक गोड फोटो देखील अपलोड केला आणि लिहिले, 'हॅपी बर्थडे शिखू'.

जान्हवीची बहिण खुशीनेही शिखर पहारियाला दिल्या शुभेच्छा

जान्हवीची बहिण खुशीनेही शिखरला दिल्या शुभेच्छा - फोटोत जान्हवी पीच आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे, तर शिखर पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या शर्टमध्ये शार्प दिसत आहे. तसेच, शिखरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर जान्हवीची पोस्ट पुन्हा पोस्ट केली. जान्हवी व्यतिरिक्त, खुशी कपूर, जी लवकरच आर्चीजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तिने देखील शिखरसाठी वाढदिवसाचा गोड संदेश पोस्ट केला. खुशीने नुकत्याच झालेल्या NMACC गालामधून शिखर पहारियासोबतचा फोटो अपलोड केला. फोटो शेअर करत खुशीने व्हाईट हार्ट इमोटिकॉनसह हॅपी बर्थडे लिहिले. आदल्या दिवशी जान्हवी कपूर शिखरसोबत तिरुमलाच्या प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात दिसली होती.

जान्हवी आणि खुशीसोबत शिखरने घेतले बालाजीचे दर्शन - पारंपारिक वेशभूषा केलेल्या या जोडीसोबत जान्हवीची धाकटी बहीण खुशी कपूरदेखील दर्शन घेताना दिसली. शिखरने पांढरे धोतर आणि किरमिजी रंगाची शाल घातली होती, तर जान्हवीने गुलाबी आणि हलका हिरवा लेहेंगा घातला होता. या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे, परंतु जान्हवी किंवा शिखर दोघांनीही त्यांच्या नात्यावर भाष्य केलेले नाही. पण ते सतत एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबद्दलची चर्चा नेहमी रंगत असते.

सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया - शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मुलीचा मुलगा म्हणजेच नातू आहे. तो पोलो खेळाडू असून व्यापारी आहे. वर्क फ्रंटवर, जान्हवी अलीकडेच सनी कौशलसोबत मिलीमध्ये दिसली होती. तिच्याकडे आता वरूण धवनसोबत बवाल आणि आरआरआर फेम ज्युनियर एनटीआरसोबतचा चित्रपट आहे.

हेही वाचा - Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नाच्या रेनबो चित्रपटाचे पोस्टर रिलीज; 7 एप्रिलपासून सुरू होणार शूटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.