मुंबई - बॉलिवूड स्टार अर्जुन कपूरने त्याचे जवळचे मित्र, कुटुंबीय यांना आपल्या घरी आमंत्रीत केले होते. सध्या त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा बाकू येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. अर्जुनच्या घरी त्याची बहिण अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया, अभिनेता वरुण धवन आणि त्याची बायको नताशा दलाल यासारखे पाहुणे अर्जुनच्या घरी आले होते.
पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी आणि शिखर एका गाडीतून यजमानाच्या घरी येताना दिसले व त्याच गाडीतून ते परतही गेले. अर्जुनच्या घरी भेट देताना जान्हवी आणि शिखरने पांढऱ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले होते. तर जुसऱ्य बाजूला वरुण धवन निळ्या रंगाच्या शर्टमध्ये त्याची डिझयनर पत्नी नताशा दलालसोबत आला होता. नताशाने काळा ट्राऊझर आणि पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता.
दरम्यान, रविवारी अर्जुनने आपल्या बाल्कनीतील स्वतःचे काही मोनोक्रॉम फोटो शेअर केले आहेत. खूप चांगला वेळ या पाहुण्यांसोबत त्याने घालवल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा तिच्या मैत्रीणींसह बाकू येथे सुट्टीवर गेली आहे. अझरबैजानमध्ये मजेत वेळ घालवत असतानाचे अनेक फोटो तिने पोस्ट केले आहेत.
कामाच्या आघाडीवर जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'बवाल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. नितिश तिवारी दिग्दर्शित 'बवाल'मध्ये तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी डिलीटल प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. जान्हवी आणि वरुण धवन स्टारर या रोमँटिक चित्रपटाचा ट्रेलर 'वर्ल्ड वॉर २' सोबत प्रदर्शित होणार आहे.
'बवाल' हा रोमँटिक बॉलिवूड चित्रपट साजिद नाडियादवाला आणि अश्विनी अय्यर यांनी निर्माण केला आहे. या चित्रपटा जान्हवी आणि वरुण धवन हे अडचणीत सापडलेल्या जोडप्याची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे बरेच शुटिंग परदेशात झाले असून सुंदर लोकेशन्सवर चित्रीत झालेली सुंदर गाणी यात पाहायला मिळतील, अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे. हा चित्रपट सुरुवातील थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता 'बवाल' चित्रपट २१ जुलै रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर झळकणार आहे.
हेही वाचा -