जेम्स कॅमेरॉनचा अवतार: द वे ऑफ वॉटरने भारतीय बॉक्स ऑफिसवर आधीच चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी, शुक्रवारी, चित्रपटाने सुमारे 40 कोटींची कमाई केली. याचा अर्थ त्याने अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर आणि स्पायडर-मॅन: नो वे होमच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. असे असले तरीही अवतार २ हा चित्रपट पहिल्याच दिवशी भारतात ५३ कोटींची कमाई केलेल्या अॅव्हेंजर्स: एंडगेमच्या कमाईला मागे टाकू शकलेला नाही.
या पूर्वी भारतात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे हॉलिवूड चित्रपट आहेत अॅव्हेंजर्स: एंडगेम ५३.१० कोटी, अवतार: द वे ऑफ वॉटर ४१ कोटी, स्पायडर मॅन ३२.६७ कोटी, अॅव्हेंजर्स इन्फीनिटी वॉर ३१. ३० कोटी आणि डॉक्टर स्ट्रेंज २७.५० कोटी.
-
#Avatar is 2ND BIGGEST HOLLYWOOD OPENER in #India... *Day 1* biz...
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐ [2019] #AvengersEndgame: ₹ 53.10 cr
⭐️ [2022] #AvatarTheWayOfWater: ₹ 41 cr+
⭐ [2021] #SpiderMan: ₹ 32.67 cr
⭐ [2018] #AvengersInfinityWar: ₹ 31.30 cr
⭐ [2022] #DoctorStrange: ₹ 27.50 cr pic.twitter.com/4Cz3ZDW2KA
">#Avatar is 2ND BIGGEST HOLLYWOOD OPENER in #India... *Day 1* biz...
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2022
⭐ [2019] #AvengersEndgame: ₹ 53.10 cr
⭐️ [2022] #AvatarTheWayOfWater: ₹ 41 cr+
⭐ [2021] #SpiderMan: ₹ 32.67 cr
⭐ [2018] #AvengersInfinityWar: ₹ 31.30 cr
⭐ [2022] #DoctorStrange: ₹ 27.50 cr pic.twitter.com/4Cz3ZDW2KA#Avatar is 2ND BIGGEST HOLLYWOOD OPENER in #India... *Day 1* biz...
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2022
⭐ [2019] #AvengersEndgame: ₹ 53.10 cr
⭐️ [2022] #AvatarTheWayOfWater: ₹ 41 cr+
⭐ [2021] #SpiderMan: ₹ 32.67 cr
⭐ [2018] #AvengersInfinityWar: ₹ 31.30 cr
⭐ [2022] #DoctorStrange: ₹ 27.50 cr pic.twitter.com/4Cz3ZDW2KA
अवतार: द वे ऑफ वॉटर चित्रपटाला पहिल्या भागाप्रमाणेच समीक्षकांनी गौरवले आहे. हा चित्रपटा भारतात कमाईचा नवा विक्रम स्थापित करु शकतो. त्यादिशेने वाटचाल सुरू असून चित्रपटाच्या अॅडव्हन्स बुकिंगलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही शहरात आयमॅक्स थिएटरमध्ये चित्रपटाचे तिकीट २५०० रुपयापर्यंत आहे. विशेष म्हणजे रविवारपर्यंत चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत.
यूएस आणि कॅनडामधील १२,००० हून अधिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०,००० हून अधिक स्क्रीनवर पदार्पण करणारा हा चित्रपट डिस्नेच्या इतिहासातील सर्वात विस्तृत रिलीझपैकी एक असेल. हे जागतिक स्तरावर प्रत्येक देशात एकाच वेळी रिलीज केले जात आहे, ही या व्यवसायातील एक दुर्मिळ गोष्ट आहे.
हेही वाचा - 'बेशरम रंग' वादात अडकला, पण एसआरकेचा 'पठाण' सेट करू शकतो नवा ट्रेंड!!