ETV Bharat / entertainment

Jailer Box Office Collection Day 13 : रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट लवकरच ३०० कोटीच्या क्लबमध्ये करणार एंट्री... - जेलरचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३

रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करताना दिसत आहे. हा चित्रपट देशांतर्गत ३०० कोटीचा आकडा आता सहज पार करू शकतो, असे सध्या दिसत आहे.

Jailer
जेलर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 1:25 PM IST

मुंबई : रजनीकांतच्या 'जेलर'ची क्रेझ प्रेक्षकांच्या डोक्यावर चढली आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. 'जेलर'ने मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन पार्ट १'च्या एकूण कमाईचा विक्रमही सहज मोडला आहे. यासह, रजनीकांतचा हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला आहे. याशिवाय 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. 'जेलर'ला रिलीज होऊन दोन आठवडे उलटूनही हा चित्रपट चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर करत आहे.

रिलीजच्या १३व्या दिवशी 'जेलर'ची कमाई : सनी देओलच्या 'गदर २'च्या वादळात 'जेलर'हा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाद्वारे रजनीकांतने दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर शानदार पुनरागमन केले आहे. 'जेलर' देशातच नाही विदेशातही चांगला लोकप्रिय ठरत आहे. अलीकडेच या चित्रपटाने जागतिक स्तरावर ५०० कोटींचा आकडा पार करून मोठी कामगिरी केली होती. दरम्यान 'जेलर'च्या रिलीजच्या १३व्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. 'जेलर'ने रिलीजच्या १३व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी ४.०७ कोटींची कमाई केली आहे. यासह, 'जेलर'ची १३ दिवसांची एकूण कमाई देशांतर्गत आता २९२ कोटी रुपयांवर पोहचली आहे.

'जेलर' ३०० कोटींपासून काही पावलं दूर : रजनीकांतच्या 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू ठेवली आहे. यासह हा चित्रपट आता ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पावले दूर आहे. बुधवारी 'जेलर' हा आकडा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. दिलीपकुमार निर्मित आणि दिग्दर्शित 'जेलर' हा डायनॅमिक अ‍ॅक्शन ओरिएंटेड चित्रपट आहे. यामध्ये रजनीकांत टायगर मुथुवेल पांडियनची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये विनायकन, रम्या कृष्णन आणि वसंत रवी हे देखील आहेत. त्याचबरोबर मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटात जबरदस्त भूमिका केली.

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant And Adil Khan : आईबाबत बोलणाऱ्या आदिल खान दुर्रानीवर राखी भडकली, म्हणाली...
  2. Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाची नवीन 'पूजा' कशी असणार? 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात
  3. Gadar 2 Box Office Collection Day 12 : 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर पार केला ४०० कोटीचा टप्पा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.