ETV Bharat / entertainment

Two Zero One Four motion poster : 'टू झिरो वन फोर'मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार जॅकी श्रॉफ, पाहा पोशन पोस्टर - Jackie Shroff starrer spy thriller

Two Zero One Four motion poster : जॅकी श्रॉफ 'टू झिरो वन फोर' या आगामी चित्रपटात जॅकी श्रॉफ बुद्धिमान आणि अनुभवी गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा सस्पेन्स आणि एक्शनने भरलेला एक थरारक चित्रपट मार्च २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.

Two Zero One Four motion poster
गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार जॅकी श्रॉफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 5:38 PM IST

मुंबई - Two Zero One Four motion poster : 'टू झिरो वन फोर' या आगामी स्पाय थ्रिलर चित्रपटासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ सज्ज झालाय. या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रसिद्ध झालंय. X ( जुन्या ट्विटरवर ) वर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हो पोस्टर शेअर करताना लिहिलंय, 'जॅकी श्रॉफची भूमिका असलेल्या 'टू शून्य वन फोर' मोशन पोस्टर आऊट झालंय...हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.'

'टू झिरो वन फोर' या चित्रपटाची कथा कॅप्टन खन्ना या बुद्धिमान आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आहे. त्याच्यावर जेव्हा फिरोज मसानी या प्रमुख पाकिस्तानी दहशतवाद्याची चौकशी करण्याचं जबाबदारी सोपवली जाते तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जातं. या मोहिमेमधून परदेशी गुप्तहेरांचा समावेश असलेला एक मोठे षडयंत्र उघडकीस येते.

'टू झिरो वन फोर' चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ निवृत्त अधिकारी कॅप्टन खन्ना ही भूमिका साकारत आहे. याबद्दल बोलताना जॅकी म्हणाला, 'टू झिरो वन फोर या चित्रपटाचा भाग बनणे हा एक आनंददायी प्रवास होता. ही एक अशी कथा आहे, ज्यात माझे पात्र गुंतागुंतीच्या प्रकरणाची हेरगिरी करतं. अशी भूमिका मी यापूर्वी कधीच साकारलेली नाही. हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा सस्पेन्स आणि एक्शनने भरलेला एक थरारक रोलर कोस्टर राईड आहे.'

दिग्दर्शक श्रावण तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, 'टू झिरो वन फोर चित्रपटातून आम्ही एक आकर्षक आणि अस्सल स्पाय थ्रिलर देण्याचं उद्दीष्ट समोरं ठेवलंय. यातून केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाही तर हिरगिरीच्या एका अनपेक्षित अवकाशाची झलक पाहायला मिळते. साहस, कटकारस्थानं आणि न्यायासाठीच्या संघर्षाची ही एक कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकासमोर घेऊन येण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत.'

हा चित्रपट आंतरराष्ट्रीय हेरगिरीच्या अद्भूत विश्वाचा ठाव घेणारा आहे. ज्यामध्ये एक देश सर्व अडचणींवर मात करत उदयास येण्याचा पर्यत्न करतं, एक नेता आपली प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि इतर गुप्तहेर संस्था त्यांच्या योजना हाणून पाडण्यासाठी एकत्र काम करतात. अशा वेगळ्या विषयावरी कथानक पहिल्यांदाच भव्य स्तरावर हिंदी पडद्यावर साकारलं जाणार आहे.

श्रवण तिवारी दिग्दर्शित आणि संदिप पटेल निर्मित हा आकर्षक गुप्तहेर थ्रिलर चित्रपट आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि गुप्त कारवायांच्या विश्वाची सफर घडवेल. 'टू झिरो वन फोर' हा चित्रपट मार्च 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा झाल्या भावूक; नात्यांमध्ये आला दुरावा...

2. War 2 Goes On Floor : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2' च्या शुटिंगला सुरुवात

3. Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण 8 व्या पर्वासाठी करण जोहर सज्ज, शेअर केली सेटची झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.