ETV Bharat / entertainment

जॅकी श्रॉफ नीना गुप्ता स्टारर 'मस्त में रहने का' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - मस्त में रहने का चित्रपटाचा ट्रेलर

Mast Mein Rehne Ka Trailer OUT : जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांच्या 'मस्त में रहने का' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईमवर 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Mast Mein Rehne Ka Trailer OUT
मस्त में रहने का चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 6:40 PM IST

मुंबई - Mast Mein Rehne Ka Trailer OUT : जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता स्टारर 'मस्त में रहने का' या चित्रपटाचा ट्रेलर हा 4 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आहे. याशिवाय या ट्रेलरमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंत देखील दिसली आहे. हा चित्रपट 8 डिसेंबरला ओटीटी प्लेटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. विजय मौर्य यांचा हा चित्रपट दोन अनोळखी व्यक्तींच्या नात्यावर आधारित आहे. 'मस्त में रहने का' या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता आणि राखी सावंतबरोबरच अभिषेक चौहान, मोनिका पनवार आणि फैसल मलिक हे कलाकार आहेत. हा चित्रपट दोन पात्रांभोवती फिरतो जे वृद्ध आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्तानी दिली प्रतिक्रिया : 'मस्त में रहने का' हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला अनेकजण पसंत करत आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना जॅकी श्रॉफनं म्हटलं की, ''एक अभिनेता म्हणून मी नेहमीच अशा भूमिकांचा शोध घेत आलो आहे, ज्या मला कलाकार म्हणून माझ्यातील क्षमता ओळखण्यास मदत करतात. या चित्रपटामधील हे एक पात्र जे वेगळं अद्वितीय असं आहे. जेव्हा मी 'मस्त में रहने का'ची स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मला या चित्रपटाची कहाणी वेगळी वाटली आणि मला ते करताना खूप मजा देखील आली''. याशिवाय चित्रपटाबद्दल बोलताना नीना गुप्तानं म्हटलं, ''जीवनाचा आनंद घेणाऱ्या एका स्त्रीची इतकी सुंदर रचलेली भूमिका साकारताना मला आनंद झाला. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या प्रवासाची जबाबदारी घ्यायची आहे आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगायचं आहे, परंतु गोष्टी नेहमी योजनेनुसार होत नाहीत. जेव्हा मी कहाणी ऐकली, तेव्हा मी खूप प्रभावित झाले आणि हे पात्र पडद्यावर जिवंत करण्याची इच्छा मला वाटली'.

'मस्त में रहने का' ट्रेलर : 'मस्त में रहने का'चा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. ट्रेलरमध्ये एकटे राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला पोलीस सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. त्यानंतर जॅकी श्रॉफ हा नीना गुप्ता यांच्या शेजारी राहायला जातो. त्यानंतर तो नीनाला भेटतो. जॅकी श्रॉफ हा 10 दिवस नीना गुप्ता यांच्या घराखाली उभा राहतो. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री होते. विजय मौर्य यांनी दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाची निर्मिती आणि लेखनही केलं आहे. या चित्रपटाद्वारे राखी सावंतही अनेक वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत परतली आहे.

हेही वाचा :

  1. 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या शोमध्ये दिसणार कियारा अडवाणी आणि विकी कौशल; प्रोमो प्रदर्शित
  2. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' चित्रपट करणार रिलीजच्या चौथ्या दिवशी 'इतकी' कमाई
  3. रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचं रिसेप्शन होणार 'या' दिवशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.