मुंबई - Arbaaz takes wife Sshura on long drive : अरबाज खान आणि शशुरा खान यांनी रविवारी मुंबईत एका छोटेखानी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी या आनंद सोहळ्याला हजर राहून दोघांच्या नवजीवनाच्या आरंभाला आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या. त्यांच्या सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्ध मिळवली आहे. त्यात भर घालण्यासाठी, अरबाज खानने सोशल मीडियावर निकाह समारंभातील नवीन फोटो शेअर केले आहेत.
अरबाज खानने अलीकडेच त्याच्या निकाह समारंभातील नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. पहिल्या फोटोत एक काझी निकाह पार पाडताना आणि वधू आणि वर लक्षपूर्वक ऐकताना दिसतात. अरबाजचे आई-वडील सलीम खान आणि सलमा खान, तसेच त्याचा भाऊ सलमान खान, मुलगा अरहान खान आणि बहीण अलविरा खान अग्निहोत्री हे सर्वजण यावेळी हज असलेले फोटोत दिसतात.
दुसऱ्या एका फोटोत संपूर्ण खान कुटुंब फॅमिली फोटोसाठी एकत्र आल्याचे दिसते. या फॅमिली फोटोत अर्पिता खान शर्मा, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, सोहेल खान, हेलन आणि इतरही दिसत आहेत. अनेक फोटो शेअर करताना अरबाजने कॅप्शन दिले: "ही तू आहेस. तो मी आहे. आम्ही आहोत."
अरबाजने पोस्ट केलेल्या फोटोंशिवाय, पापाराझी व्हिडिओमध्ये अभिनेता अरबाज खान त्याची पत्नी शुरासोबत रस्त्यावर येताना दिसत आहे. लग्नानंतर दोघे गाडी चालवताना दिसले. पापाराझींचा सामना केल्यावर अरबाज खानने स्टीयरिंग व्हीलखाली आपला चेहरा लपवलेला दिसला, तर शुराने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवलेला होता, काचेच्या रिफ्लेक्शनमुळे ते फारसे दिसत नव्हते.
अरबाजचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरासोबत लग्न केले होते. हे जोडपे 2016 मध्ये वेगळे झाले आणि 2017 मध्ये घटस्फोटाचा निर्णय दोघांनी घेतला. अरबाज खानला त्याच्या पहिल्या पत्नीपासून अरहान नावाचा मुलगा आहे. सध्या मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत डेट करत असून लवकरच तेही बोहल्यावर चढतील असा अंदाज व्यक्त केला जातो. दरम्यान अरबाजच्या या दुसऱ्या लग्नाबद्दल मलायकाने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.