ETV Bharat / entertainment

Vatsal Sheth And Ishita Dutta : इशिता दत्ता आणि वत्सल सेठच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा, झाली पुत्ररत्नाची प्राप्ती - वत्सल सेठ झाला बाबा

इशिता दत्ता आणि वत्सल शेठ दोघे आई- बाबा झाले आहेत. इशिता एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

Vatsal Sheth And Ishita Dutta
इशिता दत्ता आणि वत्सल सेठ
author img

By

Published : Jul 20, 2023, 11:44 AM IST

मुंबई : इशिता दत्ता आणि वत्सल शेठ हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. हे जोडपे एकत्र खूप क्यूट दिसतात आणि अनेकदा दोघे आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यासोबत शेअर देखील करतात. दरम्यान आता इशिता आणि वत्सल सध्या चर्चेत आले आहे. दोघेही आता एका मुलाचे पालक झाले आहेत. वत्सल सेठ आणि इशिता दत्ताने १९ जुलै २०२३ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले.

इशिता आणि वत्सल झाले आई - बाबा : मीडिया रिपोर्टनुसार आई आणि मूल दोघेही बरे असून तिला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. इशिताने बुधवारी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. नवी घरी पाहुणा आल्याने सर्व कुटुंबिय सध्या आनंदी आहे. इशिता नेहमीच गरोदरपणात तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना आणि फॉलोअर्सना अपडेट देत होती. एकदा तिने सोशल मीडियावर तिचा बेबी बंप दाखवला आणि पती वत्सलसोबत अनेक सेल्फी देखील शेअर केल्या होत्या. मंगळवारी, पुन्हा तिने एक सेल्फी शेअर केली आणि लिहिले, 'सर्व ठीक आहे, मागील महिना सोपा गेला नाही.' हे तिने आपल्या चाहत्यांना असे सांगितले.

इशिता दत्ताचा बेबी शॉवर : काही दिवसांपूर्वी इशिता दत्ताच्या आईने तिच्यासाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. इशिताने तिच्या बंगाली बेबी शॉवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. तसेच इशिताने आणखी एका कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते, या फंक्शनमध्ये तिने गुलाबी रंगाची बनारसी साडी घातली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, 'गोदभराई फंक्शन. तिच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक केले आहेत.

इशिता दत्ता-वत्सल सेठचे लग्न : २८ नोव्हेंबर २०१७ रोजी इशिताने वत्सल शेठसोबत लग्नगाठ बांधली. या वर्षी ३१ मार्च रोजी, या जोडप्याने गर्भधारणेबाबत घोषित केली होती.

हेही :

  1. Prabhas Project K first look : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' लूकने दिले ट्रोलर्सना आमंत्रण, नेटिझन्सनी केली 'आदिपुरुष'शी तुलना
  2. BPBD Box Office Collection Day 20 : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा भारतातच नव्हे जगभरात डंका, 'इतक्या' कोटींची केली कमाई
  3. Project K grand launch : 'प्रोजेक्ट के' च्या लॉन्चिंगला दीपिका पदुकोण मुकणार, वाचा खरे कारण..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.