मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अलीकडे अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबतच्या लिंकअपच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघे रोमान्स करत असल्याच्या अफवा यापूर्वी ऐकू येत असल्या तरी, मुंबईतील तानिया श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हायरल व्हिडिओने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अगस्त्य नंदाचा सुहानाला फ्लाइंग किस - सर्व अफवांना पूर्णविराम देऊन अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा, सुहाना खानला तिच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसला आणि शेवटी निरोप घेण्यापूर्वी तिला फ्लाइंग किस केला. दुसरीकडे, सुहानाने त्याला तितक्याच उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमातून दूर निघून गेली. अगस्त्यचा सुहानाला फ्लाइंग किस देतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल - आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुहानाला वाढदिवसाची होस्ट तानिया श्रॉफ, तिचा प्रियकर अहान शेट्टी, सुनील आणि माना शेट्टी आणि अगस्त्य हे सर्वजण कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसतात. यात काळ्या चमकदार ऑफ शोल्डर गाऊन आणि खुल्या केसांमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती.
'द आर्चीज'च्या सेटवर अगस्त्य आणि सुहानाची भेट - या दोघांची भेट 'द आर्चीज' या त्यांच्या डेब्यू चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे. बोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर, सुहाना आणि अगस्त्य यांच्यासह यात पदार्पण करणार आहे. शूटिंगदरम्यान दोघांचे चांगले संबंध जुळले आणि तेव्हापासून ते डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
स्टार किड्सची मांदियाळी - या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांचे स्टार किड्स हजर होते. सुहाना खान, आर्यन खान, खुशी कपूर, शनाया कपूर, अहान शेट्टी ते वरुण धवनची भाची अंजिनी धवन यांच्या उपस्थितीत स्टार किड्ससह स्टार्सने तानिया श्रॉफची बर्थ डे पार्टीचे सेलेब्रिशन पार पडले. हे सर्व स्टार किड्स उद्याचे बॉलिवूड कलाकार असल्यामुळे या पार्टीवर पापाराझी बारीक लक्ष ठेवून होते. अनेक रंजक गोष्टी शुट करताना सुहानाला अगस्त्यने दिलेला प्लाइंग किस त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu Reveals : ऊं अंटावा आयटम साँग विरोध पत्करून का केले, समंथाचा गौप्यस्फोट