मुंबई - Great Indian Festival and Big Billion Day 2023: सणांचा हंगाम सुरू झाला आहे. सणासुदीच्या काळात अनेकजण भरपूर खरेदी करतात, त्यामुळे ऑनलाइन विक्रीच्या अनेक ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पडतो. या काळामध्ये वेगवेगळ्या कंपन्या मोठ्या ऑफिर्स देऊन लोकांना शॉपिंग करण्यास भाग पाडतात. दरम्यान आता 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि 'बिग बिलियन डेज सेल' सुरु झाला आहे. या ऑफर्स 8 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. अॅमेझॉन (Amazon) , मिंत्रा (Myntra), फ्लिपकार्ट (Flipkart), मीशो ( Meesho) यासारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरही मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. मीशो आणि मिंत्रा इनसाईडरच्या ऑफर 6 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहे. याशिवाय जे मिंत्रा इनसाईडरमध्ये येत नाहीत त्याच्यासाठी सेल 7 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू झाला आहे. 'फ्लिपकार्ट प्लस' सदस्यांसाठी, द बिलियन डेज 7 ऑक्टोबरपासून सुरू झाला, तर इतरांसाठी हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.
बँक क्रेडिट कार्डचा होणार फायदा : या सेलमध्ये काही बँकांच्या ग्राहकांनाही या विक्रीवर मोठा लाभ मिळणार आहे. तुमच्याकडे SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये अधिक फायदा मिळू शकतो. याद्वारे तुम्ही 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतं. याशिवाय Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5% ची कॅशबॅक दिली जाईल. बिग बिलियन सेलमध्ये फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना ICICI, Kotak आणि Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट मिळेल. याशिवाय, जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5% इन्स्टंट डिस्काउंट आणि 5% कॅशबॅक देखील मिळेल. मिंत्रा बिग फॅशन फेस्टिव्हल सेलमध्ये, तुम्हाला कोटक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% सूट मिळेल. जर तुम्ही कोटक बँक क्रेडिट कार्डवर EMI वर खरेदी केल्यास, तुम्हाला 12% ची त्वरित सूट दिली जाईल. याशिवाय तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर ईएमआयवर खरेदी केल्यास तुम्हाला 12% ची सूट दिली जाईल.
या वस्तूंवर मिळणार ऑफर्स : अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये कपड्यावर 50 ते 80 % सूट मिळणार आहे. हा ऑफर्स खूप कमालीच्या आहेत. याशिवाय मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही, अॅमेझॉन डिव्हाइस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर 20% ते 50% सवलत देण्यात येत आहे. याशिवाय फ्लिपकार्टवर देखील 20% ते 50% सवलत फोन, लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल आणि बाकी इलेक्ट्रॉनिक्सवर सूट दिली जात आहे. तसेच मिंत्रा देखील 50 ते 90 % सुट मिळत आहे. Myntra Kotak क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला प्रत्येक वस्तूवर 7.5 टक्के सूट आणि 7.5 टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. याशिवाय मीशोवर देखील कपडे आणि दागिन्यांवर प्रचंड ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :