मुंबई - भारताच्यावतीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी अधिकृत निवडण्यात आलेल्या छेल्लो शो किंवा लास्ट फिल्म शोचा बालकलाकार राहुल कोळी यांचं कर्करोगामुळे निधन झालं आहे. ताज्या बातम्यांनुसार राहुलच्या कुटुंबीयांनी सांगितले की दिवंगत बालकलाकाराचे निधन होण्यापूर्वी त्याला वारंवार ताप येत होता. 14 ऑक्टोबरला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा कुटुंब छेल्लो शो एकत्र पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल दहा वर्षांचा होता आणि त्याने भारताच्या ऑस्कर एंट्री, छेल्लो शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो ल्युकेमियाशी लढत होता. 2 ऑक्टोबर रोजी त्याने नाश्ता केल्यानंतर काही तासांत वारंवार ताप आला होता व राहुलला तीन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. असे कुटुंबीयांकडून समजते. १४ ऑक्टोबरला त्याचा छेल्लो शो चित्रपटा रिलीज होणार असून सर्व कुटुंब एकत्र सिनेमा पाहणार असल्याचे कळते.
छेल्लो शो चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच बालकलाकार राहुल कोळीचे निधन झाल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. जामनगरजवळील हापा गावात राहुलच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी प्रार्थना सभा घेतली. राहुलचे वडील, रामू उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'चेल्लो शो'ला ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एंट्री - गुजराती चित्रपट 'चेल्लो शो'ला ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एंट्री मिळाली आहे. या चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत निवड झाल्यानंतर चित्रपटाच्या टीमवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय फिल्म फेडरेशनने मंगळवारी याची घोषणा केली. चित्रपटाचे इंग्रजी शीर्षक 'लास्ट शो' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल नलिनी यांनी केले असून हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीमसाठी ही आनंदाची बातमी असतानाच ही दुःखद बातमी आली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा बालकलाकार राहुल कोळी याचा रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे.
कोणत्या श्रेणीत निवडला गेला चित्रपट - 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मच्या श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाचा निर्माता अभिनेत्री विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉय कपूर फिल्म्स, जुगाड मोशन पिक्चर्स, मान्सून फिल्म्स, चेलो शो एलएलपी आणि मार्क डवेल यांनी केली आहे.
चित्रपटाची स्टारकास्ट - भावेश श्रीमाली, भाविन राबरी, दीपेन रावल रिचा मीना आणि परेश मेहता या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 2021 (जून) मध्ये 'ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल'मध्ये उद्घाटन चित्रपट म्हणून चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर देखील आयोजित करण्यात आला होता. स्पेनमधील 66 व्या 'व्हॅलाडोलिड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटाला 'गोल्डन स्पाइक' पुरस्कारही मिळाला आहे.
हेही वाचा - Big B Turns 80: तुम्हासम कोणी कधीच नव्हते आणि होणार नाही, नातीकडून बिग बींना शुभेच्छा