ETV Bharat / entertainment

India vs Pakistan Cricket World Cup 2023:अरिजित सिंगच्या जादूनं खचाखच भरलेल्या स्टेडियमला घातली भुरळ - ख्यातनाम पार्श्वगायक अरिजित सिंग

अहमदाबाद येथे खेळला जात असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी गायक अरिजित सिंगने खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमला मंत्रमुग्ध केलं. यावेळी अरिजितला शंकर महादेवन, सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांनी साथ दिली. पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.

India vs Pakistan Cricket World Cup 2023
ख्यातनाम पार्श्वगायक अरिजित सिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 4:02 PM IST

मुंबई - ख्यातनाम पार्श्वगायक अरिजित सिंगनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या आधी लाखाहून अधिक प्रेक्षकांना आपल्या आवजाच्या जादून मोहित करुन सोडलं. अहमदाबादमधील विशाल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही विलक्षण घटना घडली.

14 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या आयसीसी विश्वचषक 2023 च्या 12 वा सामन्यात, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा ऐतिहासिक क्षण लाखो उपस्थित आणि करोडो प्रेक्षकांनी अनुभवला. अरिजित सिंगच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी कार्यक्रमाची भव्यता वाढवली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात केली.

संगीतकार-गायक शंकर महादेवन आणि गायिका सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांच्यासोबत असलेल्या अरिजीतने खचाखच भरलेल्या स्टेडियमला त्यांच्या सादरीकरणानं भारवून टाकलं. सोहळ्याची सुरुवात अरिजित, शंकर महादेवन आणि सुनिधी यांच्या वंदे मातरम गायनानं झाली.

अरिजितनं गायलेल्या लोकप्रिय गाण्यांचे असंख्य व्हिडिओ क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्तानं इंटरनेटवर पटकन पसरले आहेत. या व्हायरल क्लिपपैकी एका व्हिडिओमध्ये अरिजितनं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील देवा देवा गातानाचा आहे. हा व्हिडिओ जुना असून 2023 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या कार्यक्रमाचा आहे. विशेष म्हणजे हे गाणं अरजित गात असताना महेंद्र सिंग धोनीही त्याच्यासोबत गाताना दिसतोय.

बॉलीवूड कलाकार, राजकारणी आणि इतर उद्योगातील सेलेब्रिटीजसह विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने सामन्याची भव्यता आणि महत्त्व वाढवले. स्क्रीन आयकॉन अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना 2023 च्या क्रिकेट विश्वचषकाचे सुवर्ण तिकीट मिळाले आहे ते देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी अहमदाबादमध्ये आले आहेत. सचिन तेंडुलकर, अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी देखील मेन इन ब्लूचा जयजयकार करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.

हेही वाचा -

1. Pm Narendra Modi Turns Lyricist : नरेंद्र मोदी बनले गरबा गाण्याचे गीतकार, ध्वनी भानुशालीनं गायलं गीत..कंगनानं दिली प्रतिक्रिया पाहा व्हिडिओ

2. Sam Bahadur : विकी कौशलनं हुबेहुब साकारले सॅम माणेकशॉ , उलगडला भारतीय सैन्याचा वैभवशाली इतिहास

3. Ind Vs Pak : भारत आणि पाकिस्तान सामन्या दरम्यान 'या' चित्रपटांचे होणार प्रमोशन....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.