मुंबई: भारत यावेळी मिस वर्ल्डच्या 71व्या यजमानपद भूषवणार आहे, याची घोषणा मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी 8 जून रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे . या कार्यक्रमात मिस वर्ल्ड 2021 कॅरोलिना बिलावस्का आणि फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी देखील उपस्थित होत्या.
130 हून अधिक देश या स्पर्धेत भाग घेणार : या स्पर्धेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पण नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023मध्ये ही स्पर्धा होणे अपेक्षित आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेत 130 हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. महाअंतिम फेरीच्या एक महिना आधी, स्पर्धकांची निवड करण्यासाठी अनेक फेऱ्या होणार आहे.
भारताचा सहा मिस वर्ल्ड : मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया मार्ले म्हणाल्या, 'मला भारतातील 71व्या मिस वर्ल्डची घोषणा करताना आनंद होत आहे. 30 वर्षांपूर्वी जेव्हा मी या अविश्वसनीय देशाला भेट दिली तेव्हापासून मला भारताबद्दल फार प्रेम आहे. ज्युलिया मोर्ले यांनी म्हटले, 'आम्ही उर्वरित जगाला तुमची अद्वितीय संस्कृती आणि काही महत्वपूर्ण ठिकाणे दाखवण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही आहे.' त्याचवेळी पत्रकार परिषदेत उपस्थित मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का म्हटले, '71व्या मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेसाठी भारत जगाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे'. शिवाय आतापर्यंत सहा वेळा भारतीयांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात रीता फारियाने 1966 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता, तर 1994 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हा किताब आपल्या नावावर केला होता. डायना हेडनने 1997 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. युक्ता मुखे हिने मिस वर्ल्डचा किताब 1999 पटकावला होता ', 'वर्ष 2000 मध्ये प्रियांका चोप्राने पुन्हा मिस इंडिया मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला होता. त्यानंतर खूप दिवसानंतर म्हणजे 2017 मानुषी छिल्लर हा किताब जिंकून भारताचे नाव जगात मोठे केले आणि ती भारताची सहावी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड बनली. आता हे मिस वर्ल्ड 2023चा किताब कुठला देश घेवून जाणार हे येणाऱ्या काळात समजेल.
हेही वाचा :