ETV Bharat / entertainment

Jawan Movie : 'जवान' चित्रपटाबद्दल शाहरुखच्या फॅन क्लबने केला खुलासा... - जवान चित्रपटाचा शो सकाळी 6 वाजता दिसणार

शाहरुख खानच्या 'जवान'च्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसातसा चाहत्यांमध्ये उत्साह वाढत आहे. शाहरुखच्या एका फॅन क्लबने 'जवान' चित्रपटाबाबत एक बातमी शेअर केली. काय आहे ही बातमी हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jawan Movie
जवान चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 4:19 PM IST

मुंबई : शाहरुख खान सध्या आगामी चित्रपट 'जवान'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे तो एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चालला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विजयाचे झेंडे रोवले होते. हा चित्रपट भारतात हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा ठरला. दरम्यान आता किंग खान हा रूपेरी पडद्यावर 'जवान' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांवर जादू करायला येत आहे. 'जवान' चित्रपटाच्या रिलीजसाठी काही दिवसच शिल्लक आहे. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांच्या डोक्यामध्ये भिनत चालली आहे.

'जवान' चित्रपटाचा शो सकाळी 6 वाजता दिसणार : 'जवान'मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, दीपिका पदुकोण आणि सान्या मल्होत्रा हे देखील कलाकर दिसणार आहेत. दरम्यान आता 'जवान' चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. मुंबईतील आयकॉनिक गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये सकाळी 6 वाजता 'जवान'चे स्क्रिनिंग आयोजित करणार आहे. आता या बातमीमुळे किंग खानच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शाहरुखच्या युनिव्हर्स फॅन क्लबच्या मते, मुंबईत सर्वाधिक मागणी असलेल्या थिएटरमध्ये हा शो आयोजित करण्यात येणार आहे. 'जवान' हा चित्रपट सर्वांधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण १००० रुपयांचे तिकिट काढयला देखील तयार आहेत. यापूर्वी अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये देखील मुंबईमधील सर्व शो हाऊसफुल झाले होते.

बुर्ज खलिफा येथे 'जवान' ट्रेलरचे अनावरण : 'जवान' हा चित्रपट साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाद्वारे ते बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली 'जवान' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. गौरी खान आणि गौरव वर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. याशिवाय या चित्रपटाचे निर्माते दुबईतील बुर्ज खलिफा येथे 'जवान' ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, शाहरुख खान हा सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये छोट्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानीचा 'डंकी'मध्ये देखील असणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. The Archies gets release date : सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट 'द आर्चीज'ची रिलीज तारीख जाहीर
  2. Miss World In Kashmir : मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने दिली नंदनवनाला भेट, पहा व्हिडिओ
  3. king of kotha box office collection Day 5 : दुल्कर सलमान स्टारर 'किंग ऑफ कोठा'नं केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.