ETV Bharat / entertainment

Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूझने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव... - baby boy

इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या नवजात बाळाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेकजण तिला शुभेच्छा देत आहे.

Ileana DCruz
इलियाना डिक्रूझ
author img

By

Published : Aug 6, 2023, 12:20 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. इलियानाला नुकतेच बाळ झाले आहे. इलियानाच्या गरोदरपणाची घोषणा झाल्यापासून चाहते या गुड न्यूजची वाट पाहत होते. तिने नुकतेच तिच्या नवजात बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या पोस्टवर तिने तिच्या मुलाचे नावही नमूद केले आहे. इलियानाला १ ऑगस्ट २०२३ रोजी मुलगा झाला. सध्या ती आणि बाळ दोघेही बरे आहेत. इलियाना सध्या खूप आनंदी आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे.

इलियानाला १ ऑगस्ट रोजी मुलगा झाला : इलियानाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये तिने 'कोआ फीनिक्स डोलन' असे नाव सांगत मुलाची जन्माची तारीख शेअर केली आहे. फोटोमध्ये बाळ हात चेहऱ्याजवळ ठेवून आरामात झोपलेल्या दिसत आहे. इलियानाच्या या पोस्टवर अनेक चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती गरोदरपणामुळे चर्चेत होती. तसेच तिने तिच्या होणाऱ्या बाळाच्या वडीलचे नाव देखील सांगितले नव्हते. तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या, इलियानाने अलीकडेच रोमँटिक डेट नाईटमधील फोटोंद्वारे तिच्या जोडीदाराची झलक शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाने आश्चर्यचकित केले होते. याआधी कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलले जात होते. मात्र इलियाना ही फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. इलियानाने अद्याप लग्न केलेले नाही, हा मुलगा तिच्या बॉयफ्रेंडचा आहे.

इलियानाने एक भावनिक पोस्ट लिहिली : इलियानाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या मुलाचे या जगात स्वागत करताना आम्ही खूप आनंदी आहोत याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. आमचे हृदय भरून आले आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा देत तिच्या मुलाच्या नावाचा अर्थही विचारत आहेत. काहीजण म्हणतात की, तिने तिच्या मुलाचे नाव अगदी विचित्र ठेवले आहे. दरम्यान या पोस्टवर एका चाहत्यांनी लिहले, 'अभिनंदन इलियाना' तर दुसऱ्या चाहत्यांनी लिहले , 'लिओ बॉय' तसेच या पोस्टवर काही कलाकारांच्या देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नर्गिस फाखरी, अर्जुन कपूर आणि हुमा कुरेशी यांनी देखील हार्दिक शुभेच्छा देत हार्ट इमोजीसह मॅसेज लिहले आहे. इलियानाच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर नुकतीच ती अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल'मध्ये दिसली होती. पुढे ती 'अनफेअर अँड लव्हली'मध्ये रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Arbaaz khan birthday : अरबाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान झाला ट्रोल...
  2. 'Scam 2003 : मालिका 'स्कॅम २००३', होणार ३० हजार कोटीच्या स्टॅम्प घोटाळ्याचा पर्दापाश
  3. Sushmita sen : सुष्मिता सेनने 'गोल्ड डिगर' म्हणणाऱ्यांना दिले चांगलेच प्रत्युत्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.