ETV Bharat / entertainment

"मी दारु पीत नाही", म्हणत सनी देओलनं सांगितलं निर्व्यसनी असल्याचं कारण - सनी देओलचा नशेतील व्हिडिओ

Sunny Deol on viral drunk video : सनी देओलने त्याच्या 'नशेत' व्हायरल झालेल्या व्हिडिओवर पुन्हा भाष्य केलं आहे. हा व्हिडिओ एका फिल्म शूटिंगच्या वेळचा होता. सनी देओल हा पूर्णपणे निर्व्यसनी असून त्याला दारु प्यायला आवडत नाही. त्यामुळे दारु पिऊन रस्त्यावर फिरण्याचा प्रश्नच येत नसल्याचं तो म्हणाला.

Sunny Deol on viral drunk video
सनी देओलनं सांगितलं निर्व्यसनी असल्याचं कारण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 6:26 PM IST

मुंबई - Sunny Deol on viral drunk video : सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर फिरतानाचा एक व्हिडिओ या महिन्याच्या सुरुवातीला समोर आला होता आणि तो व्हायरलही झाला होता. हा व्हिडिओ त्याच्या सफर या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा एक भाग होता. एका मुलाखतीत त्याने पुन्हा एकदा या विषयावर खुलासा केला आहे.

या प्रसंगावर कमेंट करताना सनी देओलने विनोदी पद्धतीने हा मुद्दा नॉन-इश्यू असल्याचं सांगत फेटाळला होता. "हा शूटिंगचा व्हिडिओ होता, खरा नाही, त्यामुळे प्रत्येकानं थंड राहिलं पाहिजे. जर मला मद्यपान करायचे असेल, तर मी ते रस्त्यावर आणि ऑटोरिक्षामध्ये करेन का? हे सत्य आहे की, मी मद्यपान करत नाही. हा व्हिडिओ खरा नसून एक फिल्म शूट आहे," असे सनी देओलने एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिलेल्या मुलाखतीत शेअर केले.

सनीने याआधी लोकेशनवरील पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो मद्यपान केल्याचा अभिनय करत आहे आणि क्रू मेंबर्स शूटिंग करण्यात व्यग्र झाले आहेत. या व्हिडिओला त्यानं "अफवाहों का 'सफर' बस यहीं तक" असं कॅप्शन दिलं होतं. मूळ व्हिडिओमध्ये सनी देओल रात्रीच्या वेळी एकटा भटकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तो गजबजलेला रस्ता ओलांडत असताना त्याच्या शेजारी एक ऑटोरिक्षा आली. चालकाने त्याला रिक्षात बसण्यासाठी सांगितल्यानंतर तो रिक्षात बसण्याचा प्रयत्न करतो अखेर चालकच त्याला बसण्यासाठी मदत करतो, असा तो व्हिडिओ होता.

सनी देओलने नेहमीच स्वतःची ओळख टीटोटेलर किंवा निर्व्यसनी अशीच करुन दिली आहे. तो कधीही दारुचं सेवन करत नाही. मॅशेबल इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “दारु पिण्याचा मी प्रयत्न केला नाही असे नाही. जेव्हा मी इंग्लंडला गेलो तेव्हा मी समाजाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न केला, परंतु मला ते कधीच समजले नाही. ते खूप कडू असतं, किती उग्र वास असतो आणि तुम्हाला डोकेदुखी देते, मग ते का प्यायचं?"

सनी देओलचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' चित्रपटाने या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे आणि एका महिन्यात तब्बल 515.03 कोटी रुपयांची कमाई केली. त्याच्याकडे आगामी काळात अनेक चित्रपट आहेत. सनीच्या पुढील भूमिकांमध्ये अभिनेता आमिर खान निर्मित राजकुमार संतोषी यांच्या 'लाहोर 1947' चा तो एक भाग असेल. . याव्यतिरिक्त, तो विवेक चौहानचा 'बाप', मल्याळम थ्रिलर 'जोसेफ'चा हिंदी रिमेक, 'शूटआउट अ‍ॅट भायखळा', 'जन्मभूमी', 'अपना 2', आणि अब्बास-मस्तान सोबतचा एक शीर्षक ठरला नसलेला चित्रपट यासारख्या चित्रपटामध्ये तो सामील आहे. सर्व चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

हेही वाचा -

  1. अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरची खिल्ली उडवणारी पोस्ट चुकून लाईक केल्यानंतर रवीना टंडनची गूढ पोस्ट

2. 'फायटर'मधील पहिले गाणे 'शेर खुल गए' झाले लॉन्च, हृतिक रोशनच्या डान्सचा अप्रतिम जलवा

3. अभिनेता श्रेयस तळपदेवर हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी, हॉस्पिटलने कोणती दिली माहिती?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.