मुंबई - सध्या अनेक चित्रपटसृष्टीमध्ये देवाण घेवाण सुरू असल्याचे दिसत आहे. मराठी कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांतून कामे करीत आहेत. आता दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकारही मराठी सिनेसृष्टीत दाखल होत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार I प्रेम U या चित्रपटटाद्वारे मराठी मध्ये अभिनय पदार्पण करीत आहे. नितीन कहार दिग्दर्शित 'I प्रेम U' मध्ये कायदू लोहार आणि अभिजित अमकर ही फ्रेश जोडी झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कायदू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर एक सांगायचंय, टकाटक अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित अमकर या चित्रपटात दिसणार आहे.
'I प्रेम U' चित्रपटाचे कथानक - 'आय प्रेम यू' चित्रपटाची कहाणी ही फक्त प्रेमकहाणी नसून मैत्री आणि त्यातून अलगद तयार झालेल्या नात्यांची कहाणी आहे. या चित्रपटात अभिजीत सखा या पात्राची भूमिका साकारत असून संगीताची आवड असलेला सखा प्रेमात कसे संगीताचे सूर भरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर कयादू या चित्रपटात वीणा हे पात्र साकारत असून स्वप्न उराशी बाळगून आलेल्या संकटाना सामोरी जाण्याची जिद्द असणारी अशी ही वीणा आपल्या प्रेमाला कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अभिजीत आमकर आणि कयादू लोहार यांची जोडी 'आय प्रेम यू' या चित्रपटातून प्रेमाचे रंग भरताना दिसणार आहे.
अभिजीत आणि कयादूची जोडी - 'टकाटक', 'एक सांगायचय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजीत अमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला. रोमँटिक कलाकारांच्या यादीत अभिजीत कुठेही कमी नाही आणि तो हे या चित्रपटातून सिद्ध करण्यास तयार झालाय. अभिजीत आणि कयादूची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्या अभिनयाच्या आणि कथेच्या जोरावर ही जोडी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडेल यात शंकाच नाही.
प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणितज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षणाशी संबंध नाही असं आइन्स्टाइन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट 'I प्रेम U' या अनोख्या चित्रपटात मांडली जाणार आहे. 'I प्रेम U' या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुर्सल, नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. येत्या १७ मार्चला 'I प्रेम U' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - Urmi Poster On Valentine Day : सायली संजीव आणि रसिका सुनील यांच्या उर्मी चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच